जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील सारीका साडी सेंटरच्या पाठीमागे आबा समुद्र यांच्या घरासमोरतळ्याचे रुप आले असून तेथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.पावसाळ्याचे दिवस असून त्याठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. हे पाणी दूषित असून हे घरात नागरिकांच्या घरात जात असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना पाहायला मिळत आहे. हे दूषित पाणी घरात शिरल्यामुळे घरातील लहान मुले- वयस्कर मंडळी यांना साथीचे आजार होऊ शकतात, याला सर्वस्वी जबाबदार हे , जामखेड नगरपरिषद असणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.! या रस्त्यावर ये – जा करता येत…
Author: mahalokwani
सचिन कांबळे:नगर-सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा 10 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजलेल्या साई उत्सवमध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये विविध वाद्य पथक सह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साईचा सजीव देखावा होता हे द्वारकामाई साई मंदिर एक एकर जागेत असून मंदिरापुढे ३ गुंठ्यामध्ये सभागृह आहे, मंदिराचा गाभारा हा २०x २० चा असून मंदिराची कळसाची उंची हि ३६ फूट आहे मंदिरातील साईंची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती मार्बलची आहे तिची उंची ५ फूट आहे मंदिरामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात तर आ संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून…
सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा जोगेवाडीचे सुपुत्र तथा युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथील शालेय मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. जोगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आले. बयाजी आंधळे,उपसरपंच राजेंद्र अबिलढगे यांच्यासह ग्रामपंचयतचे पदाधिकारी ,शाळेचे मुख्याध्यापक असलकर मॅडम, शिक्षक सपकाळ सर, साबळे सर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर.. युवा नेते अमोल आंधळे यांच्या वतीने कै.जगन्नाथ नानाभाऊ आंधळे यांच्या स्मरणार्थ ही दप्तरे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जालिंदर सारुक,विजय बडे,हनुमंत बडे, राजेंद्र आंधळे,अशोक बडे,सुभाष…
राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना घडतांना आपणास पाहायला मिळत आहे , आत्ता राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे , आता काका पुतण्या वाद जनतेसमोर आला आहे आज मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात शरद पवार भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले कि, मी शिवसेनेसोबत गेलो कारण शिवसेनेचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे पण भाजपचा हिंदुत्व हे मनुवादी आहे अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केलेली आहे. घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार … शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केलेल्या विरोधात एकत्र आल्यानं सत्ताधारी अस्वस्थ होत आहेत असं…
मुलांनी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अभ्यास करून अधिकारी व्हावे- ॲड डॉ अरुण जाधव जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. मोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ- निराधार विद्यार्थ्यांना ५० डझन वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संचालक ॲड. डॉ. अरूण जाधव,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी…
Jio Bharat V2’ अतिशय वाजवी दरात उपलब्ध, त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे Reliance Jio ने 4G फोन ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. ‘Jio Bharat V2’ अतिशय वाजवी दरात उपलब्ध असेल, त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. रिलायन्स जिओचा दावा आहे की ‘Jio Bharat V2’ च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल. jio Bharat v2 Jio Bharat V2’ हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा Rs.999 मध्ये उपलब्ध आहे. ‘Jio Bharat V2’ चा मासिक प्लान देखील सर्वात स्वस्त आहे. यासाठी ग्राहकांना 28 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनसाठी 123 रुपये द्यावे…
डाँ जाहेद बागवान सर हे न्यु इंग्लिश राजुरी येथे शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार डाँ जाहेद बागवान सर,हे दरवर्षी”बकरीद ईद ” साजरी करून “आषाढी एकादशीला ” ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्था,साईबाबा मंदीर राजुरी येथे आषाढीला पंगत देतात व स्वाता पंगतीला हाजर राहुन अभंग व हारीपाठा मधे सहभागी होतात या मधुन ते हिंदु – मुस्लिम एकतेचा संदेश देतात. ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ. प. गुरूवर्य नारायन महाराज दौंड़ हे डाँ जाहेद बागवान सर यांचा शाल व श्रीफऴ देऊन आभार व्यक्त करतात.ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्थे मधे इयत्ता ३ री ते १० वी पर्यंत चे ६० ते ७० विद्यार्थ्यी हे…
तपनेश्वर रोड येथील नागरिकांनी मानले आमदार प्रा. राम शिंदे यांचे आभार… जामखेड: जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असताना तेथील राहिवासी यांनी महालोकवाणी न्यूज चे जामखेड प्रतिनिधी धनराज पवार यांना फोन करून बातमीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यास सांगितले. याबाबत माहिती अशी की, नागरिकांनी कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांना फोन करून माहिती दिली तसेच नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा.असे सांगितले होते. त्वरित दखल घेत आमदार प्रा राम शिंदेनी महावितरण कंपनीचे…
जामखेड: जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असताना तेथील राहिवासी यांनी महालोकवाणी न्यूजचे जामखेड प्रतिनिधी पत्रकार धनराज पवार यांना फोन करून बातमीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यास सांगितले,दखल घेत त्वरित बातमी करून अवघ्या ८ दिवसांत महावितरण कंपनीने डिपीचे काम केले. ठिकाणी होणाऱ्या त्रासाला लोक कंटाळले आहेत असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास युवा पत्रकार धनराज पवार यांनी आणून दिले. तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील ट्रान्सफार्मर (डिपी मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे काही बंडखोर आमदार व नेत्यांनी काल भारतीय जनता पक्ष व शिंदे गटांबरोबर जाऊन जो शपथविधी केला आहे त्या घटनेचा निषेध आज सकाळी ठिक 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खर्डा चौक जामखेड येथे निषेध नोंदवत “आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रा.मधुकर राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, राजेंद्र पवार सर, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, बबनराव तुपेरे आदींनी निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे NCP नेते प्रा.मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सरचिटणीस राजेंद्र पवार, संचालक प्रकाश सदाफुले,…