Author: mahalokwani

जामखेड प्रतिनिधी:धनराज पवार जामखेड शहरातील आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे सोमवार दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी १२.३० वाजता जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोमवारी २६ जून रोजी श्री गोरोबा चित्र मंदिर येथून ते आदित्य मंगल कार्यालय, येथे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली नंतर आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे तसेच जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे . जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड येथे दि. २४ मे रोजी झालेल्या एका विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जामखेड ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ जून रोजी जामखेड पोलिस स्टेशन व जामखेड तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे शुक्रवारी जामखेडमध्ये पडसाद उमटले. या घटनेचा निषेध नोंदवत शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमरभाई कुरेशी, नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, प्राचार्य विकी घायतडक सर, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले आदींची भाषणे झाली. या बाबत घटनेची माहिती अशी की,जामखेड येथे दि. २४ मे २०२३ रोजी झालेल्या जामखेड येथील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका नराधम…

Read More

मुख्य आरोपी गणेश उचे आणि बोराटे पुण्यातून ताब्यात ओमकार गामा भागानगरे खून प्रकरण अवैध धंद्यांची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा नगरे यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. गणेश उचे नंदू बोराटे अशी त्यांची नावे आहेत दरम्यान काल मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्यातील संदीप घोडा प्रसार आहे. ओंकार भागानगरे ओंकार घोलप आणि इतरांनी सोमवार दिनांक 19 जून रोजी दुपारी गणेश उचे यांच्या अवैध धंद्यांची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावरून कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात उचे आणि भागानगरे घोलप यांच्यात वाद झाले त्याच रात्री बालिकाश्रम रस्त्यावर…

Read More

शेतकरी दरवर्षी शेतीसाठी अनेक राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका कडून कर्ज घेतात.मात्र शेतकऱ्यांना विहित मुदतीत कागदपत्रं पूर्तता करता येत नाही, पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रं मिळवता येत नाहीत परिणामी ते पीक कर्जापासून वंचित राहतात, खाजगी सावकारांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घेऊन कर्ज बाजारी होतात. जिल्हा बँके कडून घेतल्या जाणार्‍या कर्जाचे प्रमाण हे सर्वाधिक असते.सहकारी बँकेकडून ग्रामीण भागात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत शेतीसाठी कर्जाचे वितरण केले जाते. अनेक शेतकरी हे नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे तसेच ईतर कर्ज घेतात. हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच ईतर अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. अनेक…

Read More

कर्जत / जामखेड | सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. “जय हरी विठ्ठल” या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर वर्षी या उत्सवात सामील होतात. अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्वच पालख्या व दिंड्या आणि त्यात सामील झालेल्या वारकऱ्यांची आरोग्याशी संबंधित असलेल्या विविध अडचणी सोडवण्याच्या हेतूने आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पालखीच्या विविध मार्गावर करण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. तसेच विविध भागातून हजारो वारकरी या…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारअमृत जवान योजनेअंतर्गत आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयामध्ये सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी सायली सोळंके मॅडम, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे , कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, महावितरणचे उप अभियंता योगेश कासलीवाल, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर गुंजाळ वरिष्ठ लिपिक अंकुश हांडे, जामखेड तालुका माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके, ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजी गाडेकर उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिकांच्या विविध तक्रारी निवारण करण्याचे आश्वासन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे यांनी…

Read More

जून महिना शेवटाकडे आला असला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून Mansoon पावसाने हजेरी लावलेली नाही. शेकऱ्यांच्या पेरण्या आजून बाकी आहेत , ख खते बी बियाणे आजून खरेदी करणे बाकी आहे, अशात आता शुक्रवारपासून काही भाागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, आता पर्यंत ज्यांनी ज्यांनी मान्सून Mansoon पावसाच्या संदर्भांत जे अंदाज वर्तवले होते, ते अद्याप पर्यंत खरे झालेले नाहीत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे, शेतकरी, व्यापारी वर्ग, यांच्या मध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे. कारण या सर्व गोष्टी पावसावर अवलंबून आहे, राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, असे असतानां दुसरीकडे जून महिना संपण्याच्या…

Read More

जामखेड शहरात दिंडीचे भव्य स्वागत जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार पांडुरंगाच्या भक्तीत दंगलेल्या भक्तांना ना खान्याचे न पिण्याचे भान भक्तीमय वातावरणात श्री संत वामनभाऊ यांची पालखी जामखेड मध्ये आली असता उमडला भक्तांचा जनसागर राज्यभरातील पायी दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने आषाढी वारीसाठी रवाना झाल्या आहेत. ठिकठिकाणचे वारकरी खांद्यावर भगव्या पताका, हाती टाळ मृदुंग आणि विठूनामाचा जयघोष करत दिंड्यांमध्ये मार्गक्रमण करताना दिसत आहेत. ऐतिहासिक जामखेड नगरीच्या पावण भुमीत नागेश्वरांच्या सानिध्यात आलेल्या भाविकांचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित दादा पवार यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. आलेल्या सर्व भक्तांना अल्पोपाहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिंडीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांच्या…

Read More

जामखेड – जामखेडच्या नवनियुक्त उपविभागीय अधिकारी म्हणून सायली अशोक सोळंके यांनी आज दिनांक 21 जून 2023 रोजी पदभार स्वीकारला. उपविभागीय अधिकारी सायली सोळंके ह्यांची २०२० साली निवड झाली होती. त्यांनी पुणे येथील यशदा या संस्थेत प्रशिक्षण घेतले व आपल्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे तहसीलदार म्हणून ६ महिन्याच्या प्रशिक्षणार्थी कालावधी दरम्यान त्यांनी रस्ता केसेस, आणि विशेष सामाजिक न्याय विभागातील उल्लेखनीय कामगिरी केली. आता जामखेड तालुक्यात उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जामखेडचे तहसीलदार मा. योगेश चंद्रे साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सायली सोळंके यांनी जामखेड येथे पदभार स्वीकारला याप्रसंगी सत्कार करताना धनराज पवार

Read More

PM प्रधान मंत्री मुद्रा कर्ज Mudra Loan योजना 2023: प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMMY) भारत सरकारने एप्रिल 2015 मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश लहान व्यावसायिकांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आधीच सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकांमार्फत रु.50000/- ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. ही एक गरीब कर्ज योजना आहे, ज्या अंतर्गत सरकारने छोट्या व्यावसायिकांना बँकेकडून सुलभ अटींवर कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. https://www.amazon.in/Nervfit-Smartwatch-Resistant-Assistant-Tracking/dp/B0D6KYB414?_encoding=UTF8&pd_rd_w=2G3MU&content-id=amzn1.sym.8e750a2e-49e8-4ba5-8f59-97b80cca9f91&pf_rd_p=8e750a2e-49e8-4ba5-8f59-97b80cca9f91&pf_rd_r=170WKC22S08P61TEZXEM&pd_rd_wg=X8EdF&pd_rd_r=f7d67da2-09f3-4904-8fd0-1c234202d070&th=1&linkCode=ll1&tag=sachin03073-21&linkId=1604bfdbb1047c5941ddde98876f6705&language=en_IN&ref_=as_li_ss_tl प्रधानमंत्री मुद्रा PM Mudra Loan योजनेचे प्रमुख मुद्दे या लेखात, आम्ही मुद्रा कर्जाशी संबंधित सर्व मुद्द्यांबद्दल बोललो आहोत, जसे की – मुद्रा कर्ज काय आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, तुम्हाला…

Read More