Author: mahalokwani

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले त्याच एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची…

Read More

अहमदनगर : जामखेडच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बोगस संचालक मंडळाचे कारनामे बंद होण्यास तयार नाहीत . गेली विस वर्ष संस्थेच्या घटने नुसार एक ही निवडणूक न घेता बोगस सचालक मंडळाने आता प्राध्यापक भरती करण्यासाठी अधिकार नसताना तसा प्रस्ताव सहसचालक उच्च शिक्षण पुणे यांना दोन दिवसा पूर्वी सादर केला आहे . ही नोकर भरती करून कोट्यावधी रुपये लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे . सध्या सचिव म्हणून काम करणारे संस्थेचे साधे सभासद नाहीत .परंतु काहीही करून स्वतः च्या मुलाला प्राध्यापक करण्यासाठी धडपडत आहेत. भरती प्रक्रिया न्यायालयात आव्हान दिली जाणार आहे त्यामुळे या उमेदवारांची मोठी फसवणूक होऊ शकते.या शिक्षण संस्थेचे 2001 पासून चे सर्व बदल…

Read More

शेवगाव प्रतिनिधी – शेवगाव शहरातील दगडफेकीच्या प्रकरणापासून चर्चेत आलेले शेवगाव पोलिस ठाण्याचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन प्रशिक्षणार्थी बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना अहमदनगर नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पो नि. विलास पुजारी यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर काही राजकारण्यांनी आपले वजन वापरून त्यांना पुन्हा शेवगाव येथेच‌ राहण्याबाबत हालचाली सुरु केल्या. शेवगाव शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले होते. मागील काही दिवसापासून पोलिस प्रशासन चर्चेत असून शेवगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे,…

Read More

अहमदनगर : “ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारूण पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे; तर विखे यांच्या विरोधातील बाळासाहेब व विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १८ विजय मिळवला आहे. त्यानंतर आमदार लंके थेट राहत्यामध्ये पोहोचले असून त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. विखेच्या पराभवा बाबत बोलताना निलश लंके म्हणाले, खऱ्या अर्थाने दहशतवादाला राहत्यातील जनतेनेच मूठमाती दिली आहे. ही परिवर्तनाला खरी तर सुरुवात झाली आहे. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी…

Read More

4 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या JEE Advanced या परीक्षेचा निकाल आज 18जून 2023 रोजी लागला असून या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणेच यशाचा डंका वाजवला आहे. आधी JEE Mains , नंतर MHT CET व आता JEE Advanced परिक्षेत यश संपादन करून श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनीयशाची हॅटट्रिक साधली आहे. या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी खालील प्रमाणे All India Ranks मिळविल्या आहेत. अर्पिता दायमा AIR 3069,अमेय गायसमुंद्रे AIR 3271,सार्थक साबळे AIR 3741,निधी लोढा AIR 4593,सुमित सांगळे AIR 4757तेजस जाधव AIR 4814 श्री सांदीपणी अँकॅडमीच्या नवीन शाखेत आज या सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात…

Read More

जामखेड। धनराज पवार जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. #mscbjamkhed#mahalokwaninews#mahalokwanifollup pic.twitter.com/AbT4Jnqj4M— Mahalokwani (@mahalokwani) June 18, 2023 डीपीची जागा बदलण्याची गरज नाही; मात्र सुरक्षित आणि योग्य उपाययोजना केली जावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. आहुजा निवास समोरील ट्रान्सफार्मर (डिपी मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य वीजवाहिनी आहे. मुख्य डीपी पुरती मोडकळीस आली आहे. पूर्वी ही यंत्रणा रस्त्याच्या कडेला होती. आता सिमेंट रस्ता तयार झाल्याने डीपी अगदी रस्त्यावर आली आहे. सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ वारी साठी संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) दुपारी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान झाली आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी बरोबर दरवर्षी जवळपास ५० ते ६० हजार वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात. श्रीगहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा गुरुपरंपरेनुसार अभिषेक होईल त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर दुपारी दोन ते चार दरम्यान गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्य दिव्य दिंडीचा पुढील प्रवास सुरू होईल. त्यानंतर निवडुंगा येथे पहिला मुक्काम होणार आहे.…

Read More

कुसुम सौर पंप वितरण योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पंप वितरित केले जातील आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. पुढे आम्‍ही तुम्‍हाला कुसुम सोलर सबसिडी योजना 2023 बद्दल तपशीलवार सांगणार आहोत. ही योजना सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, जे शेतकरी सिंचनासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करतात, त्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या मशीनमध्ये रूपांतरित करता येईल. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. जर तुम्हाला कुसुम सौर पंप वितरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेची माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला कुसुम सौर पंप योजना काय आहे, कुसुम सौर…

Read More

अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम निवड आणि उज्वल भवितव्य अधिक सुखदायी करण्यासाठी प्रा. डॉ. रवींद्र बनसोड पाटील सरांचे बनसोडस् क्लासेस नगर जिल्ह्यातून 6 वर्षापासून नीट/जेईई मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी देणारे नंबर 1 क्लास ठरला आहे, नीट- 2023 मध्ये बनसोडस् क्लासेस अहमदनगर शाखेचा समर्थ जाधव 720 पैकी 665 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून सर्वप्रथम आला आहे. JEE – 2023 मध्ये समर्थ जाधव 98.77% (Percentile ) घेतले. यासाठी क्लासेस मधील सर्व स्टाफचे महत्वाचे योगदान लाभले आहे, इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते तसेच सराव पेपर विविध यशस्वी मान्यवरांचे मोटिवेशनल लेक्चर, करिअर गायडन्स अशा विविध नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात.…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली…या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत आज जामखेड शहरात याचे पडसाद उमटले समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाची सुरुवात खर्डा चौक ते तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येने हातात निळे ध्वज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते. अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील…

Read More