Author: mahalokwani

जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीन आजी- माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी जामखेड येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी अधिकारी, भुमी अभिलेख अधिकारी , गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक साहेब, व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या व जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहामधे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व माजी सैनिक,आजी सैनिक, वीरमाता,वीरपिता,शहिद परिवार,वीर पत्नी या सर्वांनी उपस्थित राहुन आपल्या अडीअडचणी समंधीत अधिकाऱ्या समोर मांडाव्यात जेने करून प्रशासनाच्या वतीने त्या दुर करण्यासाठी या तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आजी माजी सैनिकांनी मोठ्या…

Read More

बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : खानवटे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. जिद्द आणि चिकाटी या बळावरती आपण काहीही करू शकतो, महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय (Neet) परीक्षेत कु. शिवानी उमाकांत कोरे हिने 720 पैकी 578 गुण प्राप्त करून खानवटे ता. दौंड Daund जि. पुणे येथील प्रथम MBBS या क्षेत्रातील पदवी घेणारी ती विद्यार्थिनी ठरली. अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून तिने हे यश प्राप्त केले आहे. लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपलेले परंतु परिस्थितीशी झुंज देत आज तिने हे यश संपादन केले. पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे ता. दौंड Daund येथे झाले. आता तिला MBBS करायचे आहे. तर पाचवी ते…

Read More

नमस्कार शेतकरी मित्रानो , आज दिनांक 14 जून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मान्सून हा कुंपवत झाला आहे चक्रीवादळाचा परिणाम मान्सून वर झाला आहे असे panjabrao Dakh सांगितले आहे. पण आता पाऊस कधी पडणार हे जाणून घेऊया 22 तारखे पासून राज्यात पाऊस असे भाकीत panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक ,पालघर , मुंबई , सातारा , सांगली , पुणे या भागात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे . हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे . तरी शेतकऱ्यांनी पेरणीची…

Read More

दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक थॉमसनने Flipkart फ्लिपकार्टवर नवीनतम डिस्काउंट ऑफर सादर केल्या आहेत. फ्लिपकार्ट बिग डेज सेव्हिंग सेलमध्ये, तुम्ही थॉमसनचा स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन, कूलर किंवा एसी अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता थॉमसन स्मार्ट टीव्ही: 32 इंच ते 75 इंचापर्यंतच्या स्मार्ट टीव्हीवर फ्लिपकार्टवर Flipkart उत्तम सूट मिळत आहे. थॉमसनचे स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये 6,499 रुपयांपासून 79,999 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कंपनी 75 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 46% सूट देत आहे. थॉमसन कूलर: थॉमसनने नुकतीच एअर कूलरची नवीन श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये वैयक्तिक, विंडो आणि डेजर्ट एअर कूलरचा समावेश आहे. फ्लिपकार्ट Flipkart सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटनंतर हे एअर कूलर 4,999 रुपयांपासून…

Read More

मारुती सुझुकीच्या maruti suuzki वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते की, आम्ही सादर करणार असलेले नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असेल भारत देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी maruti suzuki मारुती सुझुकी  मोठ्या तयारीत आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 5 जुलै रोजी आपली नवीन कार मारुती एंगेजचे (Engage) अनावरण करणार आहे. कंपनीने देऊ केलेली ही सर्वात महागडी आणि लक्झरी कार असेल. मारुतीची( maruti) ही आगामी कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. नुकताच एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये ही कार लक्झरी असेल असे सांगण्यात आले आहे.  मारुतीची ही आगामी MPV इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल, जसे…

Read More

सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी कांदा भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे विक्रीसाठी शेतकरी येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातून तो शेतकरी सावरतो ना सावरतो तेवढ्यात सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाहीत. सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहेत. खासगी बाजार समितीत कांदा आवक जास्तखाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती 300 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत कांदा दर दिला जात आहे. सरकारी…

Read More

गेल्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे घेण्यात आलेल्या MHT CET या परीक्षेचा निकाल 12जून 2023 रोजी लागला असून या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणेच घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत अर्पिता दायमा ला 99.94, सृष्टी वायकर ला 99.79 तर सुमित सांगळे याला 99.56 गुण (PCTL) मिळाले आहेत.90 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 25 पेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षीही या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी प्रचंड यश मिळवले होते. 2015 साली संस्थेचे संस्थापक श्री के बालराजू सर यांनी 3 विद्यार्थ्यां पासून सुरुवात केलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज विशालकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. JEE MAINS परीक्षेत…

Read More

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ जुन):-आमदार श्री.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जिवे ठार मारण्याची धमकी देणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, बातमीची हकिगत अशी की, दि.३०/०५/२०२३ रोजी श्री. अमित अरुण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी,ता.जामखेड येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी करीत असताना त्यांचे मोबाईलवर सागर गवासणे याने मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे साहेबांचे जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी व फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी जामखेड पोलीस…

Read More

मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियसी ही अहमदनगर येथे काही दिवस वास्तव्यासाठी होती, आरोपीने अहमदनगर येथील मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग…

Read More

नगर – अहमदनगर महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक विनित पाउलबुधे यांच्या पत्नी सौ.सुजाता विनित पाउलबुधे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 45 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दुपारी अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व.सुजाता पाउलबुधे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व उद्योजक देवदत्त पाउलबुधे यांच्या त्या भावजयी होत. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read More