Author: mahalokwani

रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी ‘ माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तानाजी’ व ‘ आदिपुरूष’ या चित्रपटांतील भूमिकेमुळे श्री देवदत्त नागे हे लोकांच्या मनामनांत व घराघरांत पोहोचले आहेत रविवारी सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे यांचे माऊली संकुल येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे रांगोळी काढून तसेच आरती ओवाळून मोठे जंगी स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे, श्री बालराजू सर, प्रभू गिरीवरधारी, श्री राहुल गुजराल सर, श्री नानासाहेब बारहाते सर तसेच प्राध्यापक…

Read More

नगर _ जिल्हा परिषद अहमदनगर येथील माध्यामिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक गंभीर तक्रारी आहेत यासाठी विविध संघटनांनी अंदोलने केलेली आहेत या सर्व बाबींची दखल घेऊन शिक्षण आयुक्त पुणे यांनी या दोघांचा निलंबनाचा प्रास्ताव शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दिपक केसरकर यांना सादर केलेला आहे परंतु दोन महिने झाले तरी अद्याप त्यांना निलंबीत करण्यात आले नाही . त्यामुळे शिक्षक व समाजात चुकीचा संदेश जात आहे कर्तव्यदक्ष मंत्री महोदयांनी अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍याना पाठीशी घालणे योग्य नाही . त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसात निलंबीत करावे अन्यथा त्यानंतर केव्हांही पूर्वसुचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शालेय…

Read More

कर्जत- जामखेड :प्रतिनिधी धनराज पवार ॲड.डॉ. अरुण जाधव वंचित बहुजन आघाडी राज्य समन्वयक आणि शब्बीर भाई पठाण वृद्ध भूमीहीन संघटना यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.5 जून 2023 रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर जवाब दो मोर्चा वंचित बहुजन आघाडी, वृद्ध भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, लोक अधिकार आंदोलन संघटना, एकलव्य संघटना, पारधी विकास कृती समिती यांच्या वतीने काढण्यात आला होता. या मोर्चाचे मुख्य नेतृत्व ॲड. डॉ. अरुण जाधव असून गायरान जमीन नियमाकुल करून सातबारावर नोंद लावणे, भूमिहीन लोकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीत सवलत मिळावे, कर्जत तालुक्यात 1972 ते 2022 रोजी झालेल्या झोपडपट्ट्या कायम करण्यात यावात व त्यांची सिटी सर्वे वर नोंद करण्यात यावी,…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून बौद्ध तरुणाची हत्या केल्याच्या निषेधार्थ नगरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ जुन):- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकाच्या वतीने दि.५ जुन रोजी टिळकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या संदर्भात बैठक झाली.व सर्वानुमते अक्षय भालेराव या भीमसैनिकाला न्याय मिळावा यासाठी भव्य जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून विराट भिमशक्तीच दर्शन घडवून घडवून मोर्चात सहभागी व्हावे असे आंबेडकरी चळवळीतील…

Read More

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते या, यावेळी अहमदनगर शहराचे नाव बदलून आहिल्यानगर ठेवण्याची घोषणा करण्यात आली, या कार्यक्रमावेळी जामखेड शिवसेना तालुका प्रमुख मा . प्रा . कैलास माने यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला . यावेळी सत्कार प्प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांनी प्रा . कैलास माने यांच्या कामाचे तोंडंभरुन कौतुक केले, जेव्हा पासून माने यांच्यावर जामखेड तालुक्याची जबाबदारी दिली आहे , तेव्हा पासून त्यांनी…

Read More

नेप्ती तालुका अहमदनगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या आद्यवत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशी इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व विभूषित योग्य संवाद साधणारा प्राध्यापक वर्ग इत्यादी बाबींचा विचार करून राज्य तंत्र संचनालय, मुंबई यांच्या वतीने श्री छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी दिनांक 1 जून साठी प्रथम वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश सुविधा केंद्र सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली. पुढे बोलताना डॉ वाय आर खर्डे म्हणाले की, राज्य तंत्र…

Read More

अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. हे सहन केले जाणार नाही, जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी रात्री फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जण औरंगजेबचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत…

Read More

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतातील रस्त्याबाबत मोठे विधान केलेलं आहे , नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.फुटाळा येथे…

Read More

सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववतअहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहे. शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश आले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष वैभव रोडी, उपाध्यक्ष बाळासाहेब इघे, सचिव संतोष कानडे यांनी दिली. सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत सुरु झाल्याने शिक्षकेतरांची वसुली थांबेल व वेतनवाढ होवून पेन्शनधारक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील लाभ होणार आहे. सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना 15 फेब्रुवारी2011 व 28 डिसेंबर 2010 च्या शासननिर्णय आदेशानुसार सुरु झाली होती. परंतु वित्त विभागाची परवानगी न…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संस्थेचे सचिव जे.डी. खानदेशे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. रविंद्र देवढे, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. धनंजय म्हस्के, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, प्रा.दत्तात्रय नकुलवाड आदी उपस्थित होते. 15 जून पासून शाळा सुरु होणार आहे. गरजू घटकातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.…

Read More