धनराज पवार:- आज दि.4/6/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली (ता.नांदेड) येथे गुरुवारी दि.1/6/2023 रोजी रात्री अक्षय भालेराव वय 32 वर्ष दलित तरुणाची हत्या केली.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.म्हणून *मा.महेश पाटील (साहेब) पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन जामखेड अहमदनगर येथे निवेदन देण्यात आले. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय,समता,बंधुता, विश्वास,अभिव्यक्ती असा जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच बाबासाहेबांची जयंती निमित्त मिरवणूक का ? काढली म्हणून बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन नाचत होते.आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे…
Author: mahalokwani
अहमदनगर (प्रतिनिधी ): राज्यात सध्या शेतीपूर्व कामांनी वेग पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात देखील बदल होत आहे. मान्सून आगमनाची चाहूल असताना आता अहमदनगरमध्ये मान्सूनचे विजांच्या कडकडाटासह जोरात आगमन झाले. तसेच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होत आहे. यामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळत असून कमाल तापमानात देखील घट झाली आहे. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भात एक मोठे भाकीत वर्तवले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की यापूर्वी पंजाबराव डख यांनी आठ जूनला मान्सूनच राज्यात आणि चार जून अहमदनगर, बीड आणि सोलापूरमध्ये आगमन होणार असं सांगितलं होतं. मात्र आता मान्सून आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने मान्सूनचे जवळपास…
जामखेड येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ति करियर शिबीर संपन्न; शिबीरास विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद दि. 02 जून 2023 रोजी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात जामखेड येथील जगदंबा मंगल कार्यालयात हे करिअर शिबिर संपन्न झाले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांनी जामखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार श्री. रोहित पवार हे उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले का? का ते स्वतः च या…
जामखेड (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेत अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना करणार्या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नायगाव मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. मुस्लिम समाजाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शब्बीर मुलानी, अकबर मुलानी, मोईन सय्यद, अन्वर सय्यद, अमीन मुलानी, अय्युब सय्यद, सिकंदर सय्यद, अब्बास सय्यद, मोहिद्दीन सय्यद, नासिर सय्यद आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. नायगाव येथे मुस्लिम समाजाच्या मालकीची मस्जिद…
आजच्या युगात बहुतांश लोक क्रेडिट कार्ड Credit Card चा वापर करतात. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर? जर उत्तर होय असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड Credit Card वापरण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते सांगणार आहोत. दुसरीकडे, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्ही दुसरे क्रेडिट कार्ड कधी घ्यावे. जाणून घेऊयात सविस्तर क्रेडिट कार्ड Credit Card वर जरी अनेक ऑफर्स, सवलत वेळोवेळी क्रेडिट कार्डांवर येत राहतात. जे तुमच्याकडे पैसे नसल्यास तुम्ही वापरू शकता. त्यानंतर…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शासनाने जाहीर केलेले कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद ऑनलाईन झालेली नसेल तर तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे. कांदा उत्पादक काही शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्यासाठी 7/12 पीकपेरा नोंदी च्या ऑनलाईन काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्याच्या कालावधीमधील अनुदान मिळावे यासाठी अनेक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी जामखेड बाजार समितीस अर्ज सादर केलेले आहेत शेतकऱ्यांनी हस्त लिखित उतारे दिले…
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उद्या उपस्थित असणार आहेत. यावेळी खडसे यांची पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.…
जामखेड :- प्रतिनिधी धनराज पवार उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून दिले आहे. कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतु सद्यस्थितीत योग्य नियोजनाअभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भोसे खिंडीतून…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकी मध्ये जामखेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी श्री.युवराज (दादा) गोकुळ पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनाविरोध निवड झाली.सदर निवडी प्रसंगी जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बांधवांचे त्यांना सहकार्य लाभले. या निवडी बद्दल सोलापूर येथील ग्रामसेवक संघटनेचे नेते श्री.लक्ष्मण तात्या गळगुंडे पाटील , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे , मा.प्रकाश पोळ गटविकास अधिकारी यांनी त्यांचेअभिनंदन केले.. त्यांच्या या निवडी बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामधून आनंद व्यक्त होत आहे….
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात मुख्य प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या आहेत. तरी खूप वर्षापूर्वी या विद्युत वाहिन्याचे कामे झालेले आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व तसेच विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे. विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबे सुद्धा अचानक कोलमडत आहेत. त्यातच काही डि. पी. चे फ्युजाचे दरवाजे सुद्धा…