Author: mahalokwani

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटायला गेली. पतीला पाहताच ८ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे. ही महिला ८ महिन्यांची गर्भवती असून येत्या २० दिवसांनी २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. दीराने वहिणीच्या मृत्यूसाठी पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहात या महिलेचा पती असल्याची माहिती आहे. भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात ६ जून रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि पल्लवी ही ८ महिन्यांची…

Read More

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे, समान मते असतांना सभापती आणि उपसभापती हे भारतीय जनता पक्षाचे झाले, यामध्ये आमदार राम शिंदेचा जादुई करिष्मा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कर्जत – जामखेड या मतदार संघात राम शिंदेंचे वर्चस्व प्रस्थापित होतांना दिसत आहे. मतदार राम शिंदेंना पसंती देतांना पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात या सर्व बाबींचा राम शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचे गटाचे…

Read More

अहमदनगर :- अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी अशोक कडूस , अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र , वरिष्ठ सहायक विजय थोरात यांना त्वरीत निलंबीत करून दि. २६ / ६ /२३ पर्यंत कायदेशीर कारवाई करा अन्यथा दि.२६ /७ /२३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रार राजेद्र शिंदे यांनी दिला आहे. दि.१८ / ५/२३ रोजी मा. मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणविस , शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकजी केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की तकारदार यांनी मंत्रालय पातळीवर सर्व अधिकारी वर्ग ते खालील शिक्षण आयुक्त , शिक्षण संचालक , उपसंचालक अदि. ना वेगवेगळ्या मुद्यांसह व पुराव्यासह जवळ जवळ…

Read More

ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन मूग गिळून बसलय. इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व डोक्यावर घेऊन नाचणारे शिवभक्त आज शिवरायांची शिकवण विसरलेत असच म्हणावं लागेल. लोकशाहीचा चौथा मानला जाणाऱ्या पत्रकारितेला तर काही पत्रकारांनी काळिमा फासलीय. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांनी आपली लेखणीच गहाण ठेवलीय, एवढी मोठी घटना घडून सुद्धा हे गप्प बसले आहेत. जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या पिडीत विद्यार्थ्यीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला…

Read More

तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळते. जयराम बानन यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही, त्यांनी स्वत:च्या हिमतीवर सागर रत्न रेस्टॉरंटला प्रसिद्ध खाद्यपदार्थ बनवले. आज त्यांचा व्यवसाय 300 कोटींहून अधिक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयराम बानन यांचे देशभरात 60 हून अधिक आउटलेट आहेत. सागर रत्न रेस्टॉरंट हे लोकांच्या खाण्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. हे रेस्टॉरंट दक्षिण भारतीय जेवणासाठी खूप लोकप्रिय आहे. जयराम बानन यांनी सागर रत्न रेस्टॉरंटची स्थापना कशी केली आणि नवीन यशोगाथा कशी लिहिली हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जयराम बानन यांचा जन्म कर्नाटकातील उडपी येथे झाला. त्यांना वडिलांची खूप भीती…

Read More

नगर शहराचा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे कलम 37 1 व 37 3 नुसार 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्ह्यात सभा महासभा आंदोलने आणि जातीय संवेदनशील वातावरणामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी एकोणावीस जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडके, बंधूका, आधी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना त्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही

Read More

पारनेर : प्रतिनिधी न्यायाधीश म्हणून काम करताना अनेक बंधने पाळावी लागतात. या बंधनांमध्ये तसेच कायद्याच्या चौकटीत राहून पारनेर न्यायालयातील न्यायाधीश उमा बोराडे यांनी सामाजिक बांधिलकी निभावली. त्यांची पनवेल येथे बदली झाली असून त्यांच्या सामाजिक कार्याला यावेळी अनेक वकीलांनी उजाळा दिला. पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोराडे यांंची पनवेल येथे बदली झाली असून पारनेर वकील संघाच्या वतीने त्यांचा नुकताच हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. न्यायदानाने पवित्र कार्य निभावताना सामाजिक कार्यातही त्या सक्रीय असत. कोरोनाच्या संकटामध्ये निघोज येथील निवरा गृहामध्ये नांदेड येथील १०५ मजूरांना ठेवण्यात आले होते. मजूरांमधील रूपाली राहुल हुडकर हीम महिला प्रसुत झाली. एकीकडे…

Read More

नगर – तहान लागल्यावर विहिर खोदण्यापेक्षा अगोदरच पाण्याची सोय करावी म्हणजे भविष्यात अडचणी येणार नाही. त्याप्रमाणे उद्याच्या सावलीकरीता आज झाडे लावावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, भावीपिढी निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र.2 मध्ये नगर फौंडेशन आणि गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 100 झाडांचे वृक्षारोपण पूर्ण करण्यात आला. येणाऱ्या काळात वार्डात दहा हजार वृक्ष लागवड करणार आहे यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, वनरक्षक राजश्री राऊत, फौंडेशनचे रविंद्र गोरे, गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशनचे जगदीश शिंदे, राजेंद्र खेडकर, धनंजय मोकासे, सचिन…

Read More

आष्टी ( प्रतिनिधी–गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते, पाटबंधारे विभागाचे कालवा रस्ते, सर्विस रोड, अतिक्रमित झाले असून सदरील..रस्ते खुले करणे बाबर जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी सांगितले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी रस्ते, तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेले कालवे,त्यांच्या शेजारचे रस्ते, सर्विस रोड,पाणंद रस्ते, शिवरस्ते, हे रस्ते धनदांडगे शेतकऱ्यांकडून अतिक्रमित झालेले असून.. गरीब शेतकऱ्यांना हे रस्ते बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलवडगाव, दादेगाव, कडा, पिंपळा, खडकत, आष्टी, ब्रह्मगाव, पाटसरा, डोईठाण, पांढरी, डोंगरगण, हरिनारायण आष्टा, या ठिकाणी अनेक रस्ते भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशावर दिसत आहेत. परंतु…

Read More

संगमनेर मधील भगवा मोर्चाला गालबोट दोन गटात दगडफेक तणावाची स्थिती निर्माण अहमदनगर जिल्ह्यातील भगव्या मोर्चाला गालबोट लागली आहे या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली आहे दोन गटात मोठा राडा झाला आहे . त्यामुळे अहमदनगरच्या समनापुर गावात तणावाची शेती निर्माण झाली आहे या दगड पैकी मध्ये एक जण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे तत्काळ या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मोर्चात सहभागींना शांत राहण्याचे आवाहन करीत आहेत संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला वाढते गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला मोर्चादरम्यान…

Read More