सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ वारी साठी संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) दुपारी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान झाली आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी बरोबर दरवर्षी जवळपास ५० ते ६० हजार वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात. श्रीगहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा गुरुपरंपरेनुसार अभिषेक होईल त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर दुपारी दोन ते चार दरम्यान गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्य दिव्य दिंडीचा पुढील प्रवास सुरू होईल. त्यानंतर निवडुंगा येथे पहिला मुक्काम होणार आहे.…
Author: mahalokwani
कुसुम सौर पंप वितरण योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पंप वितरित केले जातील आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. पुढे आम्ही तुम्हाला कुसुम सोलर सबसिडी योजना 2023 बद्दल तपशीलवार सांगणार आहोत. ही योजना सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, जे शेतकरी सिंचनासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करतात, त्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या मशीनमध्ये रूपांतरित करता येईल. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. जर तुम्हाला कुसुम सौर पंप वितरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेची माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला कुसुम सौर पंप योजना काय आहे, कुसुम सौर…
अहमदनगर जिल्ह्यात बनसोडस् क्लासेस ठरत आहे NEET/JEE/MHT-CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम निवड आणि उज्वल भवितव्य अधिक सुखदायी करण्यासाठी प्रा. डॉ. रवींद्र बनसोड पाटील सरांचे बनसोडस् क्लासेस नगर जिल्ह्यातून 6 वर्षापासून नीट/जेईई मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी देणारे नंबर 1 क्लास ठरला आहे, नीट- 2023 मध्ये बनसोडस् क्लासेस अहमदनगर शाखेचा समर्थ जाधव 720 पैकी 665 गुण घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून सर्वप्रथम आला आहे. JEE – 2023 मध्ये समर्थ जाधव 98.77% (Percentile ) घेतले. यासाठी क्लासेस मधील सर्व स्टाफचे महत्वाचे योगदान लाभले आहे, इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाते तसेच सराव पेपर विविध यशस्वी मान्यवरांचे मोटिवेशनल लेक्चर, करिअर गायडन्स अशा विविध नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात.…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली…या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत आज जामखेड शहरात याचे पडसाद उमटले समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाची सुरुवात खर्डा चौक ते तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येने हातात निळे ध्वज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते. अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील…
जामखेड प्रतिनिधी:धनराज पवारजामखेड तालुक्यातील मोहा येथील निवारा बालगृहास कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली होती , त्यावेळी तेथील मुलांनी इच्छा दर्शविली होती.त्यास अनुसरून आमदार रोहित पवार यांनी तत्परता दाखवली आज रोजी निवारा बालगृहास LED टिव्ही भेट देण्यात आले. यावेळी कर्जत / जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे महाव्यवस्थापक यशवंतराव शितोळे यांनी बोलताना सांगितले की, मोहा येथील निवारा बालगृहामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आर्थिक परिस्थिती हालाकीचे असणाऱ्या तसेच ज्यांना कोणाचाही आश्रय नाही, जे अनाथ आहेत, मंग ते कोणत्याही जाती धर्माचे असू त्यांना इथे प्रवेश दिला जातो, या संस्थेला जामखेड मधील नागरिकांनी सुद्धा भरभरून मदत केलेली आहे, इथे शिक्षण चांगल्या प्रकारे…
गुजरातच्या किनारपट्टीवर बिपोरजॉय वादळाचा Cyclone Biparjoy जोर आता ओसरत आहे. मध्यरात्रीपर्यंत हा कहर सुरू होता. वादळ ताशी 15 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. या वादळामुळे रात्रभर पाऊस सुरू राहणार असल्याचे काल हवामान खात्याने म्हटले होते. वादळाला कच्छच्या जाखाऊ बंदरात पोहोचण्यासाठी सुमारे 2 तास लागले. पुढील 5 ते 6 तास सौराष्ट्र आणि कच्छसाठी आव्हानात्मक असणार आहेत, असे काल हवामान विभागाचे डीजी मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले होते. Cyclone Biparjoy बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असून, १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळ अरबी समुद्रात अत्यंत हळूवारपणे पुढे सरकत असल्याने…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड येथे दिनांक १५ जुन २०२३ रोजी श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडच्या वतीने जागतिक मल्लखांब दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शक्तीची देवता हनुमान व मल्लखांबचे आद्यगुरू बाळंभट्टदादा देवधर यांच्या प्रतिमेचे तसेच मल्लखांबचे पुजन जामखेड येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी मा. श्री राजेंद्र टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर श्री शंभुसूर्यच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब व विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबची बहारदार प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुख्य प्रशिक्षक मा.श्री बबलु (वस्ताद) टेकाळे यांनी मल्लखांब खेळाचा इतिहास,तसेच स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीत सराव केला पाहिजे,त्यासाठी लागणारा आहार कधी आणि…
सोमनाथ बडे : चिंचपूर पांगुळ वृत्तसेवा: श्री वामनभाऊ विद्यालयात आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क प्रदान झालेला आहे. वय वर्ष (६)सहा ते (१४) चौदा वयोगटातील सर्व मुलांची शाळेत १०० % रोज पटनोंदणी व्हावी या उद्देशाने शाळेच्या प्रथम दिवशी ‘शाळा प्रवेशेात्सव कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात होत असतात.असाच उत्साही वातावरणात पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयात आज सकाळी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत वामभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवून…
नगर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या उपनगर परिसरात पारिजात चौकामध्ये असणाऱ्या अनधिकृत गाळ्यामध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे . या परिसरामध्ये अनेक पत्र्याच्या गाळ्यामध्ये आपले व्यवसाय चालू केले आहेत, कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता किंवा प्रशासनाचे परमिशन न घेता सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करणे पत्र्याचे बांधकाम गाळे काढण्यात आलेले आहेत येथील नगरसेवक माननीय निखिल वारे यांना समजतात तिथे दाखल झाले व त्यांनी संबंधित सर्व विभागाला कल्पना दिली. त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, यांनी पण या ठिकाणी तत्काळ धाव घेतली या ठिकाणी अचानक आज दुपारी आग लागली यामध्ये व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व्यावसायिक हा सामान्य…
खर्डा येथे वडार समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक अँड डॉ.अरुण जाधव यांनी खर्डा येथे व्यक्त केले.यावेळी भाजपा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रवी सुरवसे, सरपंच वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,माजी सरपंच आसाराम गोपाळघरे,संजय गोपाळघरे,महिला काँग्रेसच्या ज्योतीताई गोलेकर, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे, उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले, सुनील साळुंखे, बिबीशन चौगुले, विलासशेठ खिवंसरा, हनुमंत कातोरे, भागवत सुरवसे, राजू डोके, कल्याण सुरवसे, दत्तात्रय भोसले,बाजीराव गोपाळघरे,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, दादा जमकावळे,महालिंग कोरे, राजू मोरे, गणेश शिंदे, दादा जावळे, योगेश सुरवसे, इत्यादी उपस्थित होते. अँड. जाधव बोलताना पुढे म्हणाले की,…