शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. मनसे नेते राज ठाकरे हेही उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करत आहेत. दुसरीकडे, राज ठाकरे यांचे भाजपा आणि शिंदे गटाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं चित्र दिसत आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना पर्याय ठरू शकतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी ठरवलं तर ते राज्याचे नेतेही होऊ शकतात, अशा आशयाचं विधान बावनकुळेंनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पर्याय असू शकतात का? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “राजकारणात…
Author: mahalokwani
मुलांचे वार्षीक स्नेह संमेलनात चिमुकल्या ना आपली कला सादर करण्याचे एक मोठे व्यसपीठ उपलब्ध असून त्यातूनच नाव नवीन कलाकार खेडयातून घडतात असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 2022_ 23 उत्साहामध्ये पार पडले त्याप्रसंगी अनुजा गायकवाड बोलत होत्या.गावातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलीयाप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड, सरपंच छाया गायकवाड,सुनील गायकवाड, संजय सावंत,दीपक गायकवाड, यांच्या सह ग्रामपंचायत सद्स व ग्रामस्थ व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आज युगात प्रत्येक पालकाला वाटते आपला मुलगा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकला पाहिजे, पण…
कांदिवली प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका चिमुकल्यांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लहान मुलांना शाळेत कसं वागवावं याबाबत अनेक संकेत तसंच नियम आहेत. पण, शिक्षकांकडून त्या नियमांचं सर्रास उल्लघन होतं.मुबई कांदिवली भागातही एक अशीच धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या शाळेतील दोन शिक्षिकांनी मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघड झालीय. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल मुंबईतील कांदिवली पश्चिममधील प्री स्कुल शाळेतील हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये दोन महिला शिक्षक मुलांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यांना वर्गात मारल्याचं आणि जमिनीवर आदळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय मुंबईच्या शाळेतील हा व्हिडीओ पाहून तुमची मुलं किती सुरक्षित आहेत?…
नंदूरबार आणि अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नगरमध्ये किरकोळ वादातून राडा अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. काल रात्री हा प्रकार घडला. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली. या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांव नगर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहर भिमजयंती उत्सव समिति च्या अध्यक्ष पदी राजन समिंदर सर, व खजिनदार पदी नाना मेघडंबर यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी जेष्ठ शिक्षक दशरथ कोपनर सर म्हणाले ,आपला एक सहकारी मित्र भिमजयंती उत्सव समिति च्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड होते ही अभिमानाची बाब आहे. आपल्यातील एक सहकारी तालुक्यात सामाजिक कार्याची धुरा सांभाळणार आहे सार्थ अभिमान वाटतो.आंबेडकर जयंती एक दिशादर्शक व आदर्श जयंती पार पाडतील असा विश्वास यावेळी गोकुळ गायकवाड सर यांनी व्यक्त केला. भिम जयंती उत्सव हा वर्षानुवर्ष…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा.अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथील शिवप्रतिष्ठान संचलित साकेश्वर गोशाळा येथे गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठाणचे तालुका प्रमुख पांडूरंग भोसले म्हणाले, प्रत्येक धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य अनमोल आहे. मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे म्हणाले की, नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य शहरात व शहरातील २१ प्रभागातील नागरिकांनी पाहिले आहे.तसेच त्यांनी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करुन जनतेची सेवा केली आहे. देशी गोवंश आहे त्याचे संवर्धन करावे अशी भावना नगरसेवक अमित चिंतामणी यांनी ठेवून आज रोजी वाढदिवसा निमित्त गायींना हिरवा चारा…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण ७ दिवसात (दि.७ मार्च २०२३ पर्यंत) काढून घ्यावीत असा विनंतीवजा आदेश दिल्यानंतर ८ मार्च रोजी त्याची मुदत संपल्याने जामखेड कर्जत रोडवरील पंचदेवालय (कोठारी पंप) येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली . हे वाचले का- BREAKING NEWS : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, त्याऐवजी हा पर्याय ? गोर गरीब टपरीधारक…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आज (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.त्यानंतर दुपारी १ वाजता संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत,महंत यांच्या हस्ते दहीहंडी फोडुन सांगता करण्यात आली. सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत ,राजकीय नेते यांनी भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्तिती होती.अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदरावजी ढोले, पाथर्डी…
शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आता डीएडचं D.ED शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं असेल तर आगामी काळात यासाठी चार वर्षांच्या पदवीचं शिक्षण घेणं अनिवार्य राहणार आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं D.ED शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार दि.०३/०४/२०२३ आज रोजी कृषि उत्पन्न बाजार समिति जामखेड पंचवार्षिक निवडणूकीसाठी सचिन (सर) गायवळ यांनी उमेद्वारी अर्ज सहायक निवडणूक अधिकारी एन.बी.मुंढे यांच्याकडे दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, खर्डा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, खर्डा सोसायटीचे संचालक चंद्रकांत गोलेकर, जामखेडचे नगरसेवक शामीर भाई सय्यद, सोनेगावचे सरपंच पद्माकर बी, जवळक्याचे मा. मा.सरपंच कांतीलाल वाळुंजकर, लोणीचे सरपंच बिबीशन परकड , वाकी सरपंच नाना वायकर , माजी सरपंच लोणी, गणेश जगताप पिंपळगाव उंडा सरपंच ,प्रवीण पोते पोतेवाडी सरपंच सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार मनोज भोरे इ कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. याबाबत माहिती अशी की,कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी…