Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Bolhegoan|बोल्हेगावातील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली
अहिल्यानगर

Bolhegoan|बोल्हेगावातील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे हटवली

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 20, 2025Updated:January 20, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लवकरच संपूर्ण बालिकाश्रम रस्ता मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करणार

कारवाईसाठी महानगरपालिकेचे पथक सज्ज; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर – बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव Bolhegoan येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली. यात जागेतील पत्र्याचे शेड काढण्यात आले. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून, येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

बालिकाश्रम रस्त्यावर महानगरपालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. त्यावर काहींनी पत्र्याचे शेड उभारून दहा ते बारा टपऱ्या टाकल्या होत्या. या सर्व टपऱ्या, शेड गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करून हटवण्यात आले. सुमारे अडीच एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्याभोवती पत्र्याची संरक्षक भिंत करण्यात येणार आहे. तसेच, बोल्हेगाव येथेही महानगरपालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या होत्या. हे अतिक्रमणही महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवले आहे.

सध्या पत्रकार चौक ते दिल्लीगेट वेस रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पत्र्याचे शेड, दुकानांचे जाहिरात फलक, फुटपाथवर साहित्य ठेवण्यात येते. या भागाची संपूर्ण पाहणी करण्यात आली आहे. तेथील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच सर्व अतिक्रमणे हटवून बालिकाश्रम रस्त्याचा श्वास मोकळा केला जाईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePalakmantri|मोठी बातमी पालकमंत्र्यांची यादी जाहीर; यांना मिळाले बीडचे पालकमंत्री पद..
Next Article Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका; मराठा नेता आक्रमक
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

December 11, 2025

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

September 14, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.