Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव – खा. नीलेश लंके यांचा संताप.!
ब्रेकींग न्यूज

Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव – खा. नीलेश लंके यांचा संताप.!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2025Updated:February 22, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर : प्रतिनिधी

गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्हयाचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके Nilesh lanke यांनी संताप व्यक्त केला.

Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव


गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय उध्वस्त करण्यात आले त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.




खा. लंके Nilesh lankeम्हणाले, जिल्हयातील नागरीकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिध्द करून ते पाडण्याचा कट जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासून रचण्यात येत आहे. जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत हे बुऱ्हानगर येथील देवीचे भक्त आहेत. तिथे त्यांचा स्वतःचाचे आउट असताना, सर्व कर भरण्यात आलेले असताना तसेच त्यांनी त्यांच्या जागेतून ग्रामस्थांसाठी रस्तेही काढून देण्यात आलेले आहेत असे असताना सकाळी गुंडाराज पध्दतीने शंभर दिडशे पोलीस तसेच काही गुंड प्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून त्या ठिकाणी आले. व सर्व जमीनदोस्त करण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

Table of Contents

  • Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव

पालखीची मोडतोड

एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो हे सांगायचे आणि दुसरीकडे २१०० वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून त्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून तक्रार केल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

वडगांव गुप्ता येथे आदिवासींच्या झोपड्या उध्वस्त

वडगांव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटूंब ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. कायद्याचा दुरउपयोग करून या आदीवासी बांधवांच्या झोपडया जमीनदोस्त करण्यात आल्याचक लंके यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झाली पाहिजे

नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत. लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे जमीनदोस्त करण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय अकासापोटी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खा. लंके यांनी केली.

विरोधकांना टार्गेट केले जात आहे

ज्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सत्ताधा-यांचे काम केले नाही अशा लोकांना ठरववून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकूण न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमीनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला ठोस पाउले उचलावी लागणार आहेत. वेगळया पध्दतीने समाजाला वेठीस धरले जाणार असेल तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदय

तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल !

महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढले तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल. महापालिका व महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये. अधिका-यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकाऱ्यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का ? असा सवाल लंके यांनी केला.

टेंडर भरणारांना दमदाटी

महानगरपलिकेमध्ये स्क्रॅपचे टेंडर होते. त्या ठिकाणी काही गुंड प्रवृतीचे लोक बसवून ठेवले. कोणी टेंडर भरण्यासाठी आले तर त्यास दमबाजी करून तिथून काढून देण्यात आले. शेवटी मी माझया कार्यालयातील माणसाला महानगरपालिकेत पाठवउन काही लोकांना टेंडर भरण्यास भाग पाडल्याचे खा. लंके यांनी सांगितले

एक दिवस किंमत मोजावी लागेल

हे सर्व थांबले पाहिजे. राजकारण सुरू राहील. सत्ता आज ना उद्या येईल. अधिकाऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांमध्ये समतोल ठेवला पाहिजे. लोकांचे आयुष्य उध्वस्त करून तुम्हाला काही भेटणार नाही. एक दिवस त्याची किंमत मोजावी लागेल असे खा. लंके यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAnil Borage|अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित
Next Article Budget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार; विधानभवनामध्ये बैठक संपन्न..
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.