Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी
ब्रेकींग न्यूज

Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद कोतवाली पोलिसांची मोठी कामगिरी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 26, 2025Updated:February 26, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- केडगाव Kedgaon येथील मोहिनी नगर मध्ये राहणारी संगीता नितीन जाधव या महिलेचा सारस दत्तू सुरवसे याने गळा आवळून खून करून तेथून पळ काढला होता.यां बाबत मयत महिलेच्या दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन कोतवाली पोलिसांना आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश दिले होते.तसा हा गुन्हा कोतवाली पोलिसांसाठी एक आव्हानच होता.या गुन्ह्याचा तपास स्वतः कोतवली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे होता.

Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद

पोलीस निरीक्षक दराडे यांनी कंबर कसली व गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता कोकाटे व पोलीस अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून त्या आरोपीचे मूळ राहते ठिकाण कर्जत तालुक्यातील माळी गल्ली येथे जाऊन त्याच्या नातेवाईकांना संपर्क केला व त्यांचे मोबाईल नंबर घेतले व मोबाईल सेल मार्फत लक्ष केंद्रित केले व त्याचप्रमाणे त्याच्या राहत्या घरापाशी साधा वेशातील पोलीस अंमलदार यांना वॉचकामी ठेवले.

Table of Contents

  • Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद

आज दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता आरोपी सारस दत्तू सुरवसे याने शहरातील माळीवाडा परिसरातील रोडवर कपडे विक्री करणारे इसमाच्या मोबाईल वरून त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केल्याचे पोलिसांना समजले. यावरून सदर कापड विक्रेता याच्याकडून माहिती घेतली असता त्याने अशी माहिती दिली की त्यांच्याकडून या आरोपीने एक लाल रंगाचा टी-शर्ट व काळे रंगाची नाईट पॅन्ट विकत घेतली व तो माळीवाडा बस स्थानकाच्या दिशेने गेल्याचे सांगितले.गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीच्या कर्जत येथील घराजवळ सापळा रचून थांबले होते कर्जत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तेथेच जागीच ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार राजेंद्र औटी, योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी, संदीप पितळे,सलीम शेख,दीपक रोहकले,तानाजी पवार,अभय कदम,अतुल काजळे,सुरज कदम,सचिन लोळगे,अमोल गाडे,संकेत धीवर,राम हंडाळ, मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू व कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रकाश दंदाडे,किरण बोराडे,प्रताप देवकाते,होमगार्ड नेवसे यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMassajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या; त्या मान्य नाही झाल्यातर पाणी ही पिणार नाही..!
Next Article Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले; आणि जाळून टाकले
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.