Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव
अहिल्यानगर

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 14, 2025Updated:September 14, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


अहिल्यानगर (प्रतिनिधी)-

महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी हा निकाल देण्यात आला आहे. सदर प्रकरणानुसार, दि.10 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी महिला आरोपीच्या घरी मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडतो, असे सांगून अरणगाव वाळकी रोडला त्याच्या कारने घेऊन गेला. तर आरोपीने फिर्यादीला गाडीतच ओढणी ओढून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.

असा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने पाच साक्षीदार उभे केले. मात्र साक्षीदारांच्या जबाबात गंभीर विसंगती आढळल्या. आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी प्रभावी उलटतपासणी करून बचाव मांडला. त्यांचे युक्तिवाद व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती यामुळे न्यायालयाने आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे अपुरे असल्याचे नमूद केले.


सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपीस सर्वच पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. आरोपीच्या बाजूने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. गणेश शेटे यांनी सहकार्य केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIndia vs Pakistan | भारत-पाकिस्तानची आज काटे कि टक्कर; असा असणार संघ
Next Article kala kendra | जामखेडमध्ये डीजेच्या ठेक्यावर छमछम, नियमांचं उल्लंघन; धाराशिव कला केंद्रावर गंभीर आरोप उघडकीस!
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

December 11, 2025

sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

July 3, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.