नूतन स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा नागरी सत्कार
महालोकवाणी न्यूज:
नगर – अध्यात्मिक कार्य करतांना समाज कार्याची प्रेरणा मिळाली. समाजकार्यातून सर्वसामान्य जनतेची कामे करतांना साईबाबांचा आशिर्वाद व पाठबळ मिळाले. नागरिकांचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ मिळाल्याने सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद झाली, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी प्रभाग क्र.2 चे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांची निवड झाल्याबद्दल दसरेनगर येथील स्वराज प्रतिष्ठान व रहिवासीयांनी नागरी सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्ष किशोर वाणे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भालचंद्र जगनाडे, योगेश सरोदे, लखन कोकूल, शेखर बनकर, मयुर सुर्यपुजारी, प्रसाद यंगलदास, श्री.जर्हाड, श्री.नलावडे आदिंसह नागरिक उपस्थित होते.
स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष किशोर वाणे यांनी प्रास्तविकात नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचे धार्मिक कार्य जेवढे मोठे आहे तेवढेच प्रभागातील कामे मोठी आहेत. त्यांचे सहकारी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्या सहकार्याने कामे मार्गी लावली. चारही नगरसेवक आमच्या भागात स्वत: लक्ष देऊन प्रश्न सोडवितात. त्यांच्या कामाची पावती म्हणजे, स्थायी समितीच्या सदस्यपदी सुनिलभाऊंची झालेली निवड, असे त्यांनी सांगितले.
