Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे दोन दिवसीय मल्लखांब प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.!

जामखेड येथे दोन दिवसीय मल्लखांब प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 9, 2023Updated:May 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार

नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीने परवा दिनांक ६-५-२०२३ ते ७-५-२०२३ रोजी जामखेड येथे श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले

हे नक्की वाचा

पंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

याप्रसंगी नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे खजिनदार तसेच महाराष्ट्रासह देशभरात मल्लखांब क्षेत्रात आपल्या निस्वार्थी कार्याने अवीट छाप सोडणारे आपल्या नगर जिल्हयातील एक महागुरू व्यक्तिमत्त्व होनाजी गोडळकर सर, सचिव अनंत रीसे सर , उपाध्यक्ष नंदेश शिंदे सर, तांत्रिक समिती प्रमुख निलेश कुलकर्णी सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.


प्रसंगी मल्लखांब खेळण्यापूर्वी कुठल्या प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे.मल्लखांबसाठी कुठली योगासने महत्वाची आहेत, स्पर्धेमध्ये मार्क कसे मिळतात, व कुठे वजा होतात तसेच बऱ्याच महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या.
खास करून गोडळकर यांचा उत्साह अतिशय पाहण्यासारखा होता.
याप्रसंगी जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीने खेलो इंडिया व महाराष्ट्र ऑलिम्पिक मल्लखांब स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जामखेडच्या श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या ४ विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप
करण्यात आले.

खास ऑफर

iPhone आयफोन चे सर्व फिचर्स या फोनमध्ये ९ मे 2023 रोजी संध्याकाळी होणार लाँच; जाणून घ्या किंमत फीचर्स.!

दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षण शिबिराने मुलांच्या खेळात शेवटच्या सत्रात पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात अमुलाग्र बदल पाहायला मिळाला.या प्रशिक्षणादरम्यान वातावरणातील बदलाने झालेल्या अवकाळी पावसामुळे मैदान भिजलेल्या अवस्थेत असतानाही,तसेच तीव्र प्रमाणात ऊन असल्याचा परिणाम मुलांच्या उत्साहापुढे टिकला नाही.
दोन दिवस चाललेल्या शिबिराचा शनिवार दिनांक ७-५-२०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता मान्यवरांचा फेटा,शाल,व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करून समारोप करण्यात आला.


समारोपाप्रसंगी आखाड्यातील मुलामुलींनी आम्हाला शिबिरादरम्यान खुप मोलाचे तसेच भरपूर प्रमाणात शिकायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. असोसिएशनच्या वतीने सचिव अनंत रीसे सर, उपाध्यक्ष नंदेश शिंदे सर, तांत्रिक समिती प्रमुख निलेश कुलकर्णी सर, यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या चाललेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले.
शेवटी श्री शंभुसुर्य मल्लखांब संस्था मातकुळीचे प्रमुख सागरदादा डोके यांनी नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरात दिलेल्या प्रशिक्षणाविषयी समाधान व्यक्त करत आभारप्रदर्शन केले.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleiPhone आयफोन चे सर्व फिचर्स या फोनमध्ये ९ मे 2023 रोजी संध्याकाळी होणार लाँच; जाणून घ्या किंमत फीचर्स.!
Next Article पंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.