भारतात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज फार महत्त्वाचा असतो. परभणी इथले पंजाबराव डख Panjanrao Dakh हे आपल्या हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेला अंदाज अचूक ठरत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
दरम्यान हवामान अंदाज दर्शविणारे हे पंजाबराव डख Panjanrao Dakh खरंच हवामान अभ्यासक आहेत का ? त्यांचं शिक्षण काय जाणून घेऊ या लेखातून थोडक्यात

अखेर पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला.! https://mahalokwani.com/?p=5548
पंजाबराव डख कसे प्रसिद्ध झाले?
परभणीतले पंजाबराव डख Panjanrao Dakh शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवत असतात. यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. ते व्हॉटसप आणि युट्यूबच्या माध्यमातून हवामान Weather अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. आपला अंदाज अचूक ठरत असल्याचा दावा स्वतः पंजाबराव डख करतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हाच दावा अनेक शेतकऱीही करतात. त्यांच्या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यामुळेच आता पंजाबराव डख बद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबराव यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी काही काळ अंशकालीन शिक्षक म्हणूनही काम केलं आहे. त्यांना हवामानाची आवड आहे, त्यामुळे त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला. ईटीडी, सीटीसी कोर्सही त्यांनी केला आहे.
पंजाबराव डख व्यवसाय करतात की नोकरी?
पंजाबराव डख पूर्ण वेळ हवामान अंदाज वर्तवतात असं नाही. ते प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर जमीन असून आपल्या शेतात ते हरभरा, सोयाबीनची शेती करतात. हवामानाच्या अंदाजासोबत ते शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्लाही देतात.
पंजाबराव डख यांच्याविषयी थोडक्यात
पंजाबराव डख Panjanrao Dakh हे परभणी जिल्ह्यातल्या गुगळी धामणगाव या गावचे आहेत. त्यांना लहानपणापासूनच हवामान अंदाज ऐकण्याची सवय होती. तसंच त्यांना हवामानात होणाऱ्या बदलांची माहिती घेण्याची उत्सुकता होती. म्हणून त्यांची हवामानाचा अभ्यास केला, निसर्गाच्या संकेतांचा, उपग्रहाचा अभ्यास केला आणि हवामान अंदाज सांगायला सुरुवात केली. त्यांचा अंदाज खरा ठरू लागल्याने परिसरातल्या शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची हवामानाचा अंदाज ओळखण्याची पध्दत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..
