Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..

Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..

mahalokwaniBy mahalokwaniJune 26, 2023Updated:June 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज फार महत्त्वाचा असतो. परभणी इथले पंजाबराव डख Panjanrao Dakh हे आपल्या हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेला अंदाज अचूक ठरत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

दरम्यान हवामान अंदाज दर्शविणारे हे पंजाबराव डख Panjanrao Dakh खरंच हवामान अभ्यासक आहेत का ? त्यांचं शिक्षण काय जाणून घेऊ या लेखातून थोडक्यात

अखेर पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला.! https://mahalokwani.com/?p=5548

पंजाबराव डख कसे प्रसिद्ध झाले?

परभणीतले पंजाबराव डख Panjanrao Dakh शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवत असतात. यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. ते व्हॉटसप आणि युट्यूबच्या माध्यमातून हवामान Weather अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. आपला अंदाज अचूक ठरत असल्याचा दावा स्वतः पंजाबराव डख करतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हाच दावा अनेक शेतकऱीही करतात. त्यांच्या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यामुळेच आता पंजाबराव डख बद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबराव यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी काही काळ अंशकालीन शिक्षक म्हणूनही काम केलं आहे. त्यांना हवामानाची आवड आहे, त्यामुळे त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला. ईटीडी, सीटीसी कोर्सही त्यांनी केला आहे.

पंजाबराव डख व्यवसाय करतात की नोकरी?

पंजाबराव डख पूर्ण वेळ हवामान अंदाज वर्तवतात असं नाही. ते प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर जमीन असून आपल्या शेतात ते हरभरा, सोयाबीनची शेती करतात. हवामानाच्या अंदाजासोबत ते शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्लाही देतात.

पंजाबराव डख यांच्याविषयी थोडक्यात

पंजाबराव डख Panjanrao Dakh हे परभणी जिल्ह्यातल्या गुगळी धामणगाव या गावचे आहेत. त्यांना लहानपणापासूनच हवामान अंदाज ऐकण्याची सवय होती. तसंच त्यांना हवामानात होणाऱ्या बदलांची माहिती घेण्याची उत्सुकता होती. म्हणून त्यांची हवामानाचा अभ्यास केला, निसर्गाच्या संकेतांचा, उपग्रहाचा अभ्यास केला आणि हवामान अंदाज सांगायला सुरुवात केली. त्यांचा अंदाज खरा ठरू लागल्याने परिसरातल्या शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची हवामानाचा अंदाज ओळखण्याची पध्दत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBJP|भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर; दोन मोठ्या राजकीय पक्षांनी दिली ऑफर.!
Next Article जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा अजब कारभार; निवडणुकीची परवानगी नसतांना घेतली निवडणूक, फसवणुकीची शक्यता.! सावधान
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.