Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे नायगाव ग्रामस्थ व मुस्लीम समाजाच्या वतीने कब्रस्थान जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण; अश्वासनंतर उपोषण मागे.!

जामखेड येथे नायगाव ग्रामस्थ व मुस्लीम समाजाच्या वतीने कब्रस्थान जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण; अश्वासनंतर उपोषण मागे.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 7, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी -धनराज पवार

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण व केलेले बांधकाम हटविण्यात यावे यासाठी नायगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात आलेले आमरण उपोषण गटविकास अधिकारी व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य ती कार्यवाही व कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!

यावेळी उपोषणास बसलेल्या समस्त मुस्लीम समाज नायगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नायगाव येथील मुस्लीम समाजाचे मिळकत नं. १३६ सार्वजनिक मस्जिद, मिळकत नं. १४० मधील सार्वजनिक आड व खुले पटांगण, मिळकत नं. १४१ खुली जागा सुलतान करीमोदिन सय्यद, बादशाह दगडू, गुलाब पापा, खुतबुद्दिन दगडू वगैरे ३. ४) मिळकत नं. १४२ खुली जागा व तालीम वरील ४ मिळकत ने मधील जागा १००x५० हि जागा आमच्या मुस्लीम समाजाच्या मालकीची आहे. कब्रस्तान व मस्जिदवरील जागेत दादाहरी उगले या इसमाने अतिक्रमण केले असून आमच्या पूर्वजाची कबर जेसीबीने उकरून त्यावर मुरूम पसरवला आहे.वरील इसमाने पक्के घर बांधून तिथे जुगार अड्डा चालू आहे. वरील इसमास वारंवार विनंती करून सुद्धा तो आमच्या ऐकून घेत नाही. गावातील सरपंच व उपसरपंच हातशी धरून त्याने उताऱ्यावर त्याचे नावाची नोंद केली आहे. त्याने आमच्या पूर्वजांचे कबर उकरून त्याठिकाणी पूर्वजांची विठंबना केली आहे. वरील लोकांचे विरुद्ध तक्रार देण्यासाठी खर्डा पोलीस स्टेशन गेले असता तक्रार दाखल करून घेतली नाही.


आमच्या मयत पूर्वजाची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करून कब्रस्तान व मस्जिदवरील अतिक्रमण त्वरित काढावे वरील मागणीकरिता नायगाव येथील मुस्लिम समाज बांधवाना न्याय द्यावा. अशी मागणी करत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी जामखेड पंचायत समितीपुढे आमरण उपोषण सुरू केले होते.यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड व ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय नायगांव यांनी नायगाव येथील अतिक्रमण धारक दादाहरी उगले यांच्या कडुन लिहुन घेतलेल्या हमीपत्र म्हंटले आहे की मी. दादाहरी दशरथ उगले, रा. नायगांव ता. जामखेड येथील रहिवाशी असुन माझ्या स्वखुशीने सदरचे हमीपत्र लिहुन देत आहे. मुस्लिम समाजाच्या मज्जीद व कब्रस्तान जागेबाबत सदयस्थितीमध्ये वाद निर्माण झालेला आहे, सदरचा वाद हा चौकशी प्रक्रियेत असुन चौकशी प्रक्रिया पुर्ण होईपर्यत मी सदर जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा वावर व हस्तक्षेप करणार नाही. तसेच जागेमध्ये असलेल्या बोअरच्या पाण्याची विक्री करणार नाही.सदर जागेमध्ये मी चौकशी प्रक्रिया व निर्णय होईपर्यंत वावर व हस्तक्षेप केल्यास मी नियमानुसार कारवाईस पात्र आहे. तसेच विवादित जागेबाबत नियमानुसार होणाऱ्या निर्णयास मी बांधील आहे. सदरचे हमी पत्र मी माझ्या स्वखुशीने व कोणाच्याही दबावाला बळी न पडता लिहुन देत आहे आसे म्हंटले आहे.


यावेळी मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझरभाई काझी, नायगाव येथील उपोषणकर्ते सिकंदर सय्यद, आमिन मुलानी, शब्बीर मुलानी, अन्वर सय्यद, आन्सार सय्यद, फीरोज सय्यद अजीम काझी, आर. पी. आय. जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, वंचित बहुजन आघाडी चे नेते अरूण जाधव, ईस्माईल सय्यद,मुक्तार सय्यद (टेलर), ईस्माईल भाई टेलर, शेख अकबरभाई, प्रहार चे नय्युम सुभेदार, नगरसेवक अर्शद शेख,मंजुरअली सय्यद, लहु पवार, इम्रान कुरेशी, अन्सार पठाण, ताहेर खान आदी मुस्लिम समाज व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही व कारवाई करण्याचे आश्वासन दिले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!
Next Article जामखेड पोलिसांची विना नंबर प्लेट गाड्यांवर धडक कारवाई ; गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार मदत .!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.