जामखेड प्रतिनिधी :धनराज पवार
अंतरवाली-सराटी. ता.अंबड जि. जालना. या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रोजी सकल मराठा जामखेड तालुक्यातील बांधवांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ रोजी जामखेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम…
ही तर सरकार ची लोकसभा निवडणुकीसाठी खेळी आहे – प्राध्यापक मधुकर राळेभात
यावेळी आंदोलकांवर लाठी हल्ला, आणि गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. व आंदोलकांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना देण्यात आले.उद्या रविवारी ३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका बंद ठेवण्याची हाक दिली आहे.
प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,ही तर सरकार ची लोकसभा निवडणुकीसाठी खेळी आहे, सरकारने इंडिया पक्ष संघटनेची मुंबई येथे बैठक झाली.लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला.राज्याचे सर्व पक्ष प्रमुख या बैठकीत हजर होते.मराठा समाजाने आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढले होते. यावेळी पोलीसांना कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागले नाही.व कालच्या घटनेतत २०० ते ४०० युवकांवर हजारोंच्या संख्येने असणाऱ्या पोलीस लाठीचार्ज करून आंदोलन चिरडून टाकतात.त्यांच्या साथीला असणाऱ्या माहिला व भगिनींना काठ्यांनी मारहाण केली.हा प्रकार निंदनीय आहे.मराठा समाजातील अनेक नेते विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. आज हा देश हुकूमशाही कडे जात आहे.लोकशाही च्या नावाखाली या देशात हुकूमशाही चालली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली ,सराटी, तालुका अंबड येथे असणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला.ह्या घटनेचा निषेध.
आण्णासाहेब सावंत म्हणाले की,जालना जिल्ह्यातील अंतरावाली घटनेच्या वेळी झालेल्या लाठीचार्ज व जाळपोळीच्या वेळी मराठा समाजाचा एक मुलगा देखील नसताना, त्यावेळी बाहेरची माणसं कोणी आणली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.मराठा समाजाच्या युवकांवर केसेस दाखल करुन त्यांना नौकरी पासून दूर ठेवायचेका? असा संतप्त सवाल यावेळी केला.
दत्तात्रय वारे म्हणाले की, सरकार मध्ये शंभरच्यावर मराठा आमदार आहेत पण तरीदेखील मराठा आरक्षणाचा मार्ग सुटला नाही. राजकीय त्याग करुन मंत्री व आमदारांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज्याच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे मराठ्यांच्या पोरांनी शेतीच करायची काय ? मंगेश आजबे म्हणाले की,येणाऱ्या काळात आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही तर ,आज पर्यंत ५८ मोर्चे शांततेत पार पडले.येथून पूढे राज्यात कोणतं ही सरकार येवू,कोणताही राजकीय पुढारी येवू यांच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन पेटल्या शिवाय राहणार नाही. यावेळी राहुल उगले पाटील, रमेश (दादा) आजबे,कुंडल राळेभात, पवन राळेभात यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या वेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, आण्णासाहेब सावंत,दत्तात्रय वारे, मंगेश आजबे,जयसिंग उगले, बजरंग मुळे,रमेश आजबे, अवधुत पवार, विकास राळेभात, मनोज भोरे, राहुल उगले, अमित जाधव, पवन राळेभात, शरद शिंदे,बाळासाहेब खैरे, प्रवीण उगले,कुंडल राळेभात,महेश राळेभात, अँड ऋषिकेश डूचे,तात्यासाहेब मुरूमकर, आप्पासाहेब कार्ले, विजय काशिद,सुनील जगताप,अण्णा ढवळे, भरत राळेभात,बाळासाहेब ठाकरे, तुकाराम ढोले, बंडु मुळे,संदीप गायकवाड, पप्पु काशिद,अमोल बिरंगळ, संतोष शिंदे, शिवाजी येवले, सचिन शिंदे,गणेश हगवणे, सचिन जाधव, राहुल घोरपडे,
शुभम राळेभात, हरिभाऊ पठाडे,आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
