Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही; सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे पाटील

मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही; सरकारला सुट्टी नाही – मनोज जरांगे पाटील

mahalokwaniBy mahalokwaniOctober 7, 2023Updated:October 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सरकारने आपल्यावर सगळे डाव टाकले तेच काही कळत नाही.डाव टाकले,हल्ले केले.मात्र मागे हटलो नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुट्टी नाही.

जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार


आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मी दिलेल्या शब्दात बदलणार नाही आणि सरकारलाही बदलू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जामखेड येथे जेसीबीच्या सहाय्याने फूलांची उधळण केली तसेच मोठा हार घालून हलगीच्या सवाद्यात स्वागत केले.तसेच जरांगे पाटील यांची विराटसभा झाली.

जरांगे म्हणाले की , आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. कुठेही उद्रेक करू नये. जाळपोळ करू नये. आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांची पोर मेले तर आरक्षण कुणासाठी मिळवायचे? असा सवाल करत आता आरक्षण शेवटच्या क्षणापर्यंत आले आहे. ही संधी सोडायची नाही, असे आश्वासन करत उग्र आंदोलन करू नका.

माझे शरीर साथ देत नाही, परंतु तुमची उर्जा मला शांत बसू देत नाही. सरकार आरक्षण देणार आणि मराठेही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणारच नाही. मी तुमच्यातला आहे. मराठा समाजाच्या शब्दापुढे जाणार नाही आणि मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. सरकारचे सगळे डाव उलटून लावले आहेत. सरकार नुसते पळतेय आरक्षण देण्यासाठी सरकार एक महिना मुदत दिली. यादरम्यान पाच हजार पुरावे दिले आहेत. आता कायदा पारीत करून, आरक्षण द्यावे.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
मनोज जरांगे पाटील यांनी सायंकाळी पाच वाजता चोंडी येथे भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी जरांगे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर,बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,सचिन (सर) गायवळ, रवि सुरवसे, अजय काशिद,गौतम उत्तेकर, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, लहू शिंदे, मंगेश आजबे, सोमनाथ पाचारणे, रमेश आजबे, तुषार पवार, ॲड.प्रवीण सानप, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, अक्षय शिंदे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDisease । 100 विद्यार्थिनी झाल्या अचानक लंगड्या; रहस्यमयी आजारामुळे शहरातील शाळा बंद; पाहा व्हिडीओ..
Next Article Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला; सात हजार रॉकेटचा मारा इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 100 ठार, अवीवने गाझामध्ये 198 ठार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.