Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार. संग्राम जगताप यांच्या मनात चालले तरी काय ? वाचा काय घडले असे..?

आमदार. संग्राम जगताप यांच्या मनात चालले तरी काय ? वाचा काय घडले असे..?

mahalokwaniBy mahalokwaniOctober 15, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती अतिशय भयावह आहे , कोण कोणत्या पक्षाचा आमदार , कोण कोणत्या गटात आहे हे समजणे कठीण आहे, थोड्याच दिवसात राज्यात निवडणुकांचा बिघुल वाजणार आहे, यातच मराठा आरक्षण प्रश्न राज्यात गाजत आहे पण अहमदनगर मध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे .

आमदार. संग्राम जगताप यांच्या मनात काय ?

काल दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर येथे महसूल इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यकम संपन्न झाला, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे बॅनर नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने लावण्यात आले होते, पण या बॅनरवरती ना शरद पवारांचा फोटो ना अजित पवारांचा फोटो असे चित्र पाहायला मिळाले, यावरून आमदार संग्राम जगताप यांच्या मनात नेमके चालले तरी काय? असा प्रश्न नगरकरांच्या मनात उपस्थित होत आहे .

Royal Enfield| बुलेट प्रेमींसाठी खास सणासुदीची भेट, रॉयल एनफील्ड नव्या लूकमध्ये

अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मनात नेमके चालले तरी काय , असा प्रश्न आत्ता सर्वसामान्य नगरकरांना पडतांना दिसत आहे. एकेकाळी शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे संग्राम जगताप आत्ता अजित पवार यांच्या गटात सामील झालेले पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांनी संग्राम जगताप अनेक संधी उपलब्ध करून दिल्या पण त्यांनी अजित पवार गटासोबत जाणे पसंद केले आहे .

आत्ता नगरकरांना हे समजत नाही की , आमदार संग्राम जगताप हे कोणाबरोबर म्हणजेच कोणत्या पक्षात आहेत , कारण पण तसेच आहे, माघील काही कालावधी पासून ते भारतीय जनता पक्षाच्या अधिक जवळीक असल्याचे नगरकरांना दिसत आहे, कारण ते माघील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे ,

आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे यांच्यात जवळीक.

अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही कार्यक्रम असो, किंवा उदघाटन असो यामध्ये आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाहायला मिळत आहेत , एवढेच काय तर कोणत्याही वार्डात किंवा नगरसेवकांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमांना देखील हे दोघे उपस्थित असतात, भूमिपूजन असो तिथेही हेच चित्र पाहायला मिळत आहे, आत्ता जरी वरती यांची युती झाली आहे, पण युती नसतांना देखील हेच चित्र होते,

आत्ता संग्राम जगताप ज्या अजित पवार गटात आहेत त्याच गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे आहेत, पण इथे चित्र वेगळे पाहायला मिळत आहे , जगताप हे लंके सोबत कमी आणि सुजय विखे यांच्या सोबत जास्त जवळीक असल्याचे चित्र आहे, यामाघे नेमकी कोणती खेळी आहे हे थोड्याच दिवसात जनतेसमोर येईल असे दिसत आहे, मध्यन्तरी एका कार्यक्रमात खासदार सुजय विखेंनी जगताप यांना भाजपा सोबत येण्याची ऑफर सुद्धा दिलेली पाहायला मिळत आहे

आमदार. संग्राम जगताप यांच्या मनात काय ?
आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे यांच्यात जवळीक.

संग्राम जगताप यांनी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, यात संग्राम जगताप यांचा पराभव सुजय विखे यांनी केला होता . तरीही या दोघांची जवळीक सध्या नगरमध्ये चर्चेचा विषय बनत आहे , पण दुसरीकडे एकाच पक्षात असणारे आमदार निलेश लंके आणि संग्राम जगताप यांच्यात काही तरी बिनसले आहे, कारण यातील कोणाचाही कार्यकम असला तरी दोन्ही आमदार एकमेकांना बोलवीत नाहीत, उलट निलेश लंके यांचे विरोधक समजले जाणाऱ्या विखे सोबत संग्राम जगताप जास्त जवळीक असतात. विखे यांच्याबरोबर जवळीक सांधण्यामाघे जगताप यांचा कोणता स्वार्थ तर नाही ना ? का नगरचा विकास करण्यासाठी हे दोघे जवळ आले आहेत , हा येणारा काळच सांगणार आहे , पण सध्या याची चर्चा जोरात आहे

आत्ता हे नजर चुकीने झाले आहे काय ? का खरच आमदार संग्राम जगताप यांच्या मनात काय वेगळे विचार चालू आहेत, हे येणाऱ्या काळात नगरकरांना नक्की समजणार आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRoyal Enfield| बुलेट प्रेमींसाठी खास सणासुदीची भेट, रॉयल एनफील्ड नव्या लूकमध्ये
Next Article Worldcup2023| पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी; ऑस्ट्रेलियाचं नेमकं काय चुकतंय ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.