नगरसेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे अमित चिंतामणी – अभिनेत्री जान्हवी किल्लेकर
जामखेड प्रतिनिधी
जे सिने कलाकार आपण पडद्यावर पाहतो.अशा कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी अमित चिंतामणी हे करुन देतात. कोजागिरी पौर्णिमे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन हे फक्त अमित चिंतामणी यांनीच करावे.व त्यांचे कार्यक्रम हटके असतात.गेल्या दहा वर्षांत सिध्द झाले आहे. तसेच जामखेड शहरातील प्रत्येक प्रभागातील लोक विचारतात आमच्या प्रभागात अमित चिंतामणी सारखे दर्जेदार कामे का नाहीत. अमित चिंतामणी वर जामखेडकरांचा खुप मोठा विश्वास आहे. असे कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे बोलत होते.

जामखेड शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही ओपन गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमासाठी बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्या उपस्थितीतीने जामखेडकरांचा उत्साह दिसून आला. यावेळी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन आमदार प्रा. राम शिंदे तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा.मधुकर राळेभात म्हणाले की,जामखेड शहर हे विकसित होत असलेले शहर आहे. असे असताना शहरात सांस्कृतिक कार्यक्रम होणे आवश्यकच आहे. हीच गरज अमित चिंतामणी यांनी ओळखून अशाच एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करून जामखेडच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले पाहिजे.
अमित चिंतामणी हे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गेल्या नऊ वर्षांपासून भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करतात.नगरसेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजेच नगरसेवक अमित चिंतामणी आहेत.एक आदर्श व कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून अमित चिंतामणी यांचे शहरात ओळख आहे.कार्यतत्पर नगरसेवक यांच्या कार्यातून नक्कीच शहराची प्रगती होईल.यापासून कोणी त्यांना रोखू शकत नाही. नागरिकांनी चिंतामणी यांच्या पाठीशी उभे राहावे. तुम्ही समाज कार्यात खूप पुढे जाल.मी सुध्दा गणराया चरणी प्रार्थना करेल असा विश्वास अभिनेत्री जान्हवी किल्लेकर’यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, प्रविण चोरडिया,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, मोहन मामा गडदे,पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी,नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, इम्रान कुरेशी,जमीर सय्यद, विष्णू गंभीरे,ॲड. प्रविण सानप,तात्याराम पोकळे, केदारशेठ रसाळ,भाऊ परदेशी, उमाकांत कुलकर्णी, गणेश काळे, सचिन मासाळ,बाबासाहेब फुलमाळी, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच याप्रसंगी आमदार प्रा राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे , भाजपा माहिला आघाडी तालुकाध्यक्ष संजिवनीताई पाटील,अंजलीताई अरुण चिंतामणी, प्रांजलताई अमित चिंतामणी, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई सोमनाथ राळेभात,अर्चनाताई संपत राळेभात, माजी सभापती सौ. मनिषा ताई सुरवसे आदी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी आलेल्या माता भगिनीसाठी नाष्टा म्हणून शाबुवडा व मसाला दूधाची सोय करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित खांडविकर,
ईश्वर साळुंके, नितीन जगताप ,विशाल टाक, राहुल चिंतामणी,योगेश राऊत, विठ्ठल परांडकर,पिनु राऊत, दादा कुलथे, अतुल पवार, बाळासाहेब हारणे, संतोष जगताप,राजु भुजबळ,राजु गवळी, नागेश टेकाळे,प्रतिक उदारे आदी मित्र परिवाराने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश दिवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित खांडविकर यांनी मानले.
