महालोकवाणी न्यूज: दिल्लीतील (Delhi) दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून (CBI) त्यांना आता सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते आणि त्याचवेळी त्यांना अटक होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. सिसोदिया यांना अटक करण्यात आली. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया (manis Sisodiya) हे दोन नंबरचे नेते आहेत.पक्षाची रणनीतीकारांपैकीही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्ली सरकारमधील ते दोन नंबरचे सर्वात शक्तिशाली नेते होते. सिसोदिया यांच्या अटकेमुळे आम आदमी पार्टीपासून सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत. मंत्री सत्येंद्र जैन हेही…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार संत निरंकारी मंडळ शाखा जामखेड अंतर्गत जवळा शाखेच्या वतीने आज दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. संत निरंकारी मिशन व भारत सरकार यांचे संस्कृती मंत्रालय यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्ताने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचे आदेशानुसार पाणी पुरवठा विहीर मुंजेवाडी तलाव जवळा या ठिकाणी अमृत प्रोजेक्ट अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन ” या उपक्रमाचा शुभारंभ जवळा ग्रामपंचायत चे सरपंच प्रशांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे म्हणाले , संत निरंकारी मिशन हे “पुण्याचे काम व सेवा करण्याचे काम करीत आहे. आज रोजी भारत सरकार यांचे संस्कृती…
महालोकवाणी न्यूज : नगर – सावेडी उपनगरातील संदेशनगर येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.अनिल कटके, नगर तालुका पोलिस स्टेशन सहाय्यक पो.नि.राजेंद्र सानप, तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री मुकूल गंधे, डॉ.शैलेश भणगे, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, डॉ.विजय जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, उपसरपंच अलका गायकवाड, शिवव्याख्याने अभय जावळे, शिवशाहिर विक्रम अवचित्ते, सौ.मंदाताई डोंगरे, पै.संदिप डोंगरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात…
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांची दमदार कामगिरी महालोकवाणी न्यूज सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी गंभीर जखमी करून लुटल्या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डी, दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन आरोपीना गजाआड केले आहे. बंडूशेठ चिंतामणी हे गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले असता त्यांचा शेवगाव रोड लगत अर्जुना लॉन्स जवळ असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली असता चिंतामणी यांनी त्यास विरोध केला.त्यावेळी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे कुंभारगाव तालुका इंदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांना अरवाच्छ भाषेत लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरून हताला धरून त्यांचा विनयभंग करण्यात आला अशी तक्रार दिनांक 24रोजी भिगवण तालुका इंदापूर येथे सरपंच उज्वला परदेशी यांनी दाखल केली आहे. कुंभारगावच्या महिला सरपंच यांना सरपंच पदी विराजमान होऊन दोन वर्षे झाली या दोन वर्षात त्यांनी गांवामध्ये रस्ता कोक्रेटिकरण असेल घरकुल योजना बंदिस्त गटर शिलाई मशीन पिट गिरणी गावामध्ये शासकीय बचत गटांच्या स्थापना गाय गोटे धरण उशाशी आणि कोरड गशासी अशी गावची अवस्था असताना त्यांनी गावामध्ये जलजीवन मिशन ह्या मोठ्या योजनेचे काम गावामध्ये पूर्णत्वास नेहले आहे अजून बऱ्याच योजना लोकांपर्यंत…
झाडं, फळं- फुलं, इतर वनस्पतींपासून किंवा सूक्ष्मजीव कीटकांपासून खताची निर्मिती करणं आपण ऐकलं असेल. आता ही काही वेगळी गोष्ट राहिली. पण, आता मानवी मृतदेहापासून सुद्धा खताची निर्मिती करण्यात येतंय, असं जर मी सांगितलं. तर तुम्हाला तर नवल वाटेल. पण हो खरंय. आता न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने नुकतंच ह्युमन कंपोस्टिंगला मान्यता दिलीये. याच निमित्ताने ह्युमन कंपोस्टिंग म्हणजे काय? ह्युमन कंपोस्टिंग कसं केलं जातं? याच विषयी जाणून घेऊ. ह्युमन कंपोस्टिंग म्हणजे काय?माणूस मेल्यानंतर वेगवेगळ्या समाजात त्याच्या अंत्यसंस्कारच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुणी दहन करतं, तर कुणी दफन करतं. पण आता मानवी मृतदेहापासून खताचे उत्पादन केलं जाणार आहे. आता एखादी व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले…
महालोकवाणी प्रतिनिधी : सोमराज बडे शेवगाव – येथील गंगामाई साखर कारखान्यात इथेनॉल टाक्यांच्या भीषण स्फोटा मुळे कारखाना यंत्र सामुग्री भीषण आगीच्या भक्ष स्थानी पडली असून आगीत मोठमोठे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गंगा माई साखर कारखाना प्रा.लि.परिसरातील इथेनॉल टाक्यांना अचानक आग लागून स्फोट होण्यास सुरवात झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु केली आगीची तीव्रता मोठी असल्याने शेवगाव (Shevgoan),भेंडा,पाथर्डी व पैठण येथून अग्निशामक गाड्या व् रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या असून परिसरात धुरांचे लोट पसरल्याने व आगीत वारंवार स्फोट होत आल्याने आग विझवण्यात अडथळा येत आहे.आगी मुळे घटना ठिकाणी पोहचता येत…
नूतन स्थायी समिती सदस्य सुनिल त्र्यंबके यांचा नागरी सत्कार महालोकवाणी न्यूज:नगर – अध्यात्मिक कार्य करतांना समाज कार्याची प्रेरणा मिळाली. समाजकार्यातून सर्वसामान्य जनतेची कामे करतांना साईबाबांचा आशिर्वाद व पाठबळ मिळाले. नागरिकांचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ मिळाल्याने सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद झाली, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी प्रभाग क्र.2 चे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांची निवड झाल्याबद्दल दसरेनगर येथील स्वराज प्रतिष्ठान व रहिवासीयांनी नागरी सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्ष किशोर वाणे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भालचंद्र जगनाडे, योगेश सरोदे, लखन कोकूल, शेखर बनकर, मयुर सुर्यपुजारी, प्रसाद यंगलदास, श्री.जर्हाड, श्री.नलावडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. स्वराज्य…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारपांडुराजे भोसले यांचे कार्य उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष मा. पांडुरंग मधुकर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जि प प्राथमिक शाळा महादेव गल्ली येथे चार सिलिंग फॅन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले पांडू राजे यांचे काम राजासारखे आहे तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यात कुठेही कोणास अडचण आल्यास पांडू राजे यांच्या नावावर काम होते त्यांनी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेत लहान लहान मुले आहेत आता नुकताच उन्हाळा आलेला आहे त्यामुळे चार सिलिंग फॅन दिली आहेत तसेच मुलांना खाऊ वाटप केलेला आहे,सामाजिक…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड- सौताडा राष्ट्रीय महामार्ग ५४८डी च्या कामांचा शुभारंभ आज रोजी खर्डा चौक येथे पार पाडला. यावेळी अहमदनगर दक्षिणचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना विखे म्हणाले की,केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार आहेत तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात देखील डबल इंजिन सरकार आहे.. मतदारसघांतील प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे.तसेच मतदरसंघांतील सर्व घटकांना न्याय देऊ असा विश्वास डॉ सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री प्रा. आमदार राम शिंदे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार किती फायद्याचे आहे. पुन्हा एकदा देशाच्या…