Author: mahalokwani

पुणे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे गेले तीन महिन्यापासून मुख्य रस्त्याच्या कडेला विनापरवानगी खोदलेली चारी जिवघेणी ठरत आहे दिनांक 05/01/2023 रोजी. बापू सरोदे हे शेतातून चारा घेऊन येत असताना ते समोरून दुसरे वाहन आल्यामुळे व रस्ता अरूंद झालेने घसरूण खोदलेल्या चारीमध्ये मोटर सायकल सह पडले .त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व ते थोडक्यात बचावले या निष्काळजी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे ते पुढे म्हणाले की गेले तिन महिन्यापासून गावात संबधित चारी खोदत असताना मधेच काम बंद करून चारी न बुजवता संबंधित लोंढे ठेकेदार चारी उघडी ठेवून निघून गेलेला आहे त्या मजोर ठेकेदारास संपर्क साधला असता…

Read More

लखनऊ : लग्नाची एक अतिशय अजब घटना नुकतीच समोर आली आहे. संभलच्या असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक विचित्र प्रकार उघडकीस आला. अमरोहा येथून लग्नाची वरात घेऊन आलेल्या तरुणाने असमोली परिसरातील गावात एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र यानंतर मोठा गदारोळ झाला. काही वेळातच दोघांचा घटस्फोट झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. नवरदेवाची पहिली पत्नी अचानक तिथे आल्याने हा गोंधळ उडाली. उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात ! हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसली आणि पंचायतीच्या आदेशावरून अखेर हा अजब निर्णय घेण्यात आला. अमरोहा जिल्ह्यातील सैदगनली पोलीस स्टेशन हद्दीतील गावातला…

Read More

दिनांक 5 जाने : झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नका, प्रसंगी केंद्राने यात हस्तक्षेप करावा, झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील, अशी जैन…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे हि योजना अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकरी ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु दिड लाखाच्या मर्यादेत आहे अशा शेतकरी यांना नवीन विहीर , जुन्या खाजगी विहिरी ची दुरुस्ती , पंपसंच , शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण , विजजोड तसेच सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचे लाभासाठी राज्य शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 पासून प्रक्रिया ही संगणकीकृत केली असून लॉटरी पध्दतीने लाभार्थी यांची निवड केली जाते. पंचायत समिती दौंड अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाचे सुरक्षित अशी वर्गवारी असलेल्या 45 गावांमध्ये नवीन विहिरी मंजूर केल्या जातात या योजेनेमधील निवडी साठी नवीन विहीर या बाबीसाठी किमान 0.40 हे आर. क्षेत्राची मर्यादा असून जास्तीत जास्त 6 हे क्षेत्राची…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा संकुल व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कराटे, तायक्वांदो, जुडो, शिकाई मार्शल आर्ट, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग या स्पर्धांमध्ये सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी प्राची कापडी, समीक्षा बंगाळ, सिद्धी झारखड, श्रुती झारखड, कृष्ण सुरासे, चैतन्य भोर, सार्थक भोसले, शिफा शेख, तनवी सेंडकर यांनी मिळवला तर शिकाई मार्शल आर्ट या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी सिद्धी झारकड, श्रुती झारकड, प्रेमराज सरडे, जय नजन,सृष्टी भुजाडी, प्राची गुप्ता, तनवी शेंडकर यांनी मिळवलेजुडो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी संकल्पिता खर्डे, धनश्री अकोलकर, श्रुती झारखंड यांनी मिळवले तर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांककृष्ण सुरासे, सार्थक उंडे…

Read More

कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखल जात. नगदी पीक असल्याने शाश्वत उत्पन्न यातून शेतकऱ्यांना मिळत असतं. गेल्यावर्षी तर विक्रमी दर कापसाला मिळाला होता यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई झाली होती. यंदा मात्र कापूस दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर मध्ये कापूस 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढ्या सरासरी दर पातळीवर पोहचला होता. मात्र डिसेंबर महिन्यात यामध्ये घसरण झाली. विशेषता डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापूस दरात मोठी घसरण झाली. महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी ! कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. दरम्यान आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे. कापसाला साडेआठ…

Read More

Urvashi Rautela: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला दिल्लीत ३० डिसेंबरला अपघात झाला होता. चाहत्यांना अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियासह सर्वत्रच त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. त्यातच एका व्यक्तीची कमाल चर्चा होती ती म्हणजे, उर्वशी रौतेला. दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल ! ऋषभबद्दल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही क्रिकेटपटूचे नाव न घेता त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. आता तिची आई मीरा रौतेलानेही ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने चाहत्यांना ऋषभसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ती बरीच प्रसिद्धी…

Read More

Delhi: दिल्लीमधील नववर्षाच्या रात्री झालेल्या भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच राजधानी दिल्लीमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याने तरुणाने तरुणीवर सपासप वार केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना सोमवारी दिल्लीच्या आदर्शनगर भागात घडली असून युवतीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. (Delhi Crime) महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी ! याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही दिल्ली विद्यापीठात बी.ए.चे शिक्षण घेत होती; 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरशी मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच मुलीने स्वतः हून सुखविंदरपासून लांब राहायला…

Read More

महावितरणचे खासगीकरण थांबवण्यात यावे. या मागणीसाठी पुकारलेला संप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एकूण ३२ कर्मचारी संघटना या संपात सामील झाल्या होत्या. या सर्वच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना, काल रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसंदर्भात संप सुरू केला होता. यात कंत्राटी कर्मचारी संघटनेचाही समावेश होता. यावेळी तीन-चार मुद्द्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षांत या तीन कंपन्यांमध्यये ५० हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार स्वतः करणार आहे.…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी – बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा घणाघातस्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. असे मत अजित पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून माझ्या विरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. इतिहास संशोधकांनी या मुद्द्यांवर संशोधन करून वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे मांडणी करावी. खरा इतिहास समोर…

Read More