Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे पाटील – 9604737188 पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे महालोकवाणी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अंजनगाव तालुका बारामती येथे रात्रीच्या वेळेस अवैद्य वाळू उत्खनन जोरात सुरू आहे.या ठिकाणी बेसुमार उत्खनन झालेले असून लाखो रुपयांची शासनाची. मालमत्ता चोरून नेहलेली आहे.या कर्हा नदीच्या पात्रामध्ये आपणाला मोठे मोठे खड्डे पाहायला मिळत आहे.याच गावातील एका पुढाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की या ठिकाणी रात्रीचे वेळी दोन जेसीबीने आणि पाच ते सात ट्रॅक्टर यावेळी बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक करत .गावात व इतरत्र विक्री करून लाखो रुपये कमवत आहेत . आसाच वाळू उपसा चालू राहिला तर नदिचा प्रवाह बदलू शकतो…

Read More

पत्नीने तक्रार दखल केल्याचा राग महालोकवाणी न्यूज पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे याने गावठी कट्टयाचा धाक दाखवून तुला रहायचे आहे का? तुला गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अरूण गणपत दाते ( वय ४२,रा. वासुंदे) हे राहत्या घराजवळील विहीरीवरुन पाणी आणण्यासाठी गेले असता संतोष खोसे तेथे आला. तुझ्या बायकोने माझ्या विरूध्द पोलिस ठाण्यात फिर्याद का दिली ? तुला जिवंत गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. त्याच्यासोबत विकास सुरेश रोकडे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- पुणे, 11 जानेवारी :  एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी आईला CCTV च्या आधारे मंचर पोलिसांनी तीन तासांत पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिका नकोशी झालेल्या जन्मदात्या आईचा शोध घेऊन CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी तिला अटक केली. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव..’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेच तिला नकोशी केलं…! आई…

Read More

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न महालोकवाणी न्यूज:- नाशिक, प्रतिनिधी) ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. आपण बँक लोन साठी पात्र आहात की नाही असे चेक करा समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन…

Read More

लवकरात लवकर कारवाई न केल्यास दि. २० जानेवारी रोजी ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन….! शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )दि. १०/०१/२०२३ शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत विविध विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी लेखी मागणी मौजे सुकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लहूराव भवर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज :- दिनांक 10 जाने 2023 जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते आज दिनांक 10 /01/ 2023 रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले बारामती शहराचा विकास केल्याने पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही तसेच बारामतीच्या के व्हि‌.के च्या कृषी प्रदर्शना प्रमाणे भारतीय जनता पार्टी कसलेही शुल्क शेतकऱ्यांकडून घेत नाही कृषी प्रदर्शनाचा.सर्व शेतकऱ्यांना फायदा मोफत होणार आहे व हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले आहे असे ते म्हणाले।फेसबुक लाईव्ह आल्याने .महाराष्ट्रातील प्रश्न सुटत नाहीत असे म्हणत सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता…

Read More

महालोकवाणी न्यूज आजचा दिवस महत्त्वाचा आणि निर्णयाक आहे. आज सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आज निवडणूक आयोगामध्येही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हं कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केली आहेत. या आमदारांना नोटीस महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानेमौजे अंजनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक 07 ते 13 जानेवारी पर्यंत संपन्न ह़ोत आहे तसेच. माननीय प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रकांत कांबळे डॉ. विलास वसंतराव कर्डिले, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सह १५० स्वंयसेवकांसह आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता व जळगाव ते बऱ्हाणपूर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये अंजनगाव शिवारात 500 चिंचेची झाडे लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. आज या निवासी शिबिर स्थानाला भेट देत असताना सोमेश्वर हायस्कूलचे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- CIBIL बँक तुमचे कर्ज मंजूर करेल की नाही हे ठरवण्यात सिबिल स्कोअरची मोठी भूमिका असते. सिबिल स्कोअर ३ गुणांचा आहे. हे ग्राहकांच्या क्रेडिट इतिहासाबद्दल सांगते. त्याला एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट प्रोफाइलचा आरसा म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीने आपले कर्ज कसे फेडले आहे किंवा सर्व प्रकारची बिले फेडण्यात तो कसा आहे, या गोष्टी क्रेडिट स्कोअर तयार करतात. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान आहे. सिबिल स्कोअर ९०० च्या जितक्या जवळ जाईल, तितके ग्राहकाचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते. सिबिल ही देशातील चार क्रेडिट रेटिंग एजन्सींपैकी एक आहे क्रेडिट स्कोअर असा तपासावा विनामूल्य क्रेडिट स्कोअर मिळविण्यासाठी https://creditreport.paisabazaar.com/credit-report/apply भेट द्याआपले पूर्ण नाव,…

Read More

चौथ्या पर्वाची महाविजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज एक घर, 16 स्पर्धक आणि 100 दिवसांचा प्रवास संपला आहे. अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. खेळाडूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा, घरातील वावर, टास्क जिंकण्याची जिद्द यामुळे ती कायम चर्चेत राहिली. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदानाच्या शुभेच्छा देत लाईक्स…

Read More