छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं वसईत एका मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडलीये. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल उचलल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. इतक्या कमी वयात आपल्या अभिनयाच्या बळावर मालिका आणि चित्रपट विश्वात आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जग सोडून गेल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. तुनिषानं २० व्या वर्षी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत चांगली कमाई केली होती. तुनिषा शर्मा अलिबाबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. याच मालिकेच्या सेटवर तिने आपलं आयुष्य संपवलं. येत्या ४ जानेवारी रोजी अभिनेत्री तुनिषा शर्मा आपला वाढदिवस साजरा करणार होती. मात्र, त्या आधीच तिने…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज करीत आहे पाठपुरावा पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे मौजे स्वामी चिंचोली (शरदनगर) तालुका दौंड येथे दिनांक 26/ 12/2022 रोजी. सकाळीपासून अवैद्य मुरुम उत्खनन जोरातत सुरू आहे या बोगस उत्खननाबाबत माननीय तहसीलदार दौंड यांचा कसलाही आदेश नाही अथवा परवानगी नाही दिनांक 26 रोजी फार मोठ्या प्रमाणात दहा ते बारा टायर हायवा गाड्या दिवसभर उत्खनन . केलेला बोगस मुरूम वाहतूक करत होत्या .याबाबत जयंत भोसले तलाठी यांना विचारले असता बघतो करतो अशी उत्तरे दिली मंडल अधिकारी नेवसे यांना विचारले असता संबंधित ठेकेदाराने चलन भरले असून आदेश अजून झालेले नाही असे सांगितले ग्रामसेवक कांबळे यांना विचारले आसता ते म्हणाले उद्या दिनांक…
महालोकवाणी न्यूज दि. 26 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना अपघात झाल्याची प्रथमदर्शनी समोर येत आहे यामध्ये त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाले आहे. प्रथम उपचार केल्यानंतर जखम अधिक तीव्र असल्याने त्यांना मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात सकाळी मॉर्निंग वॉकला सिविल लाईन येथे गेले असता अचानक चलता चलता पाय घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत व हात फॅक्चर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यापूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात करण्यात आलेल्या डॉक्टरांनी तपासले मेयो येथील उपचारानंतर त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले
जामखेड ता.25 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जामखेड तालुका आयोजित ना डॉ रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केक कापून कार्यक्रम संपन्न झाला. सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष शामीर सय्यद, नगरसेवक मा बाळासाहेब शिंदे रिपाइं जामखेड तालुका अध्यक्ष धरम दादा घायतडक, बाबा सोनवणे रिपाइं युवक जिल्हा कार्याध्यक्ष, देवा साळवे युवक तालुकाध्यक्ष, शिवाजी साळवे,सुजीत धनवे, राम साळवे ग्रामपंचायत सदस्य, बापू जावळे महादेव महारनवर,राज गायकवाड, लखन साळवे निवारा बाल गृह अधिक्षक वैजीनाथ केसकर,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी सुनील भाऊ साळवे रिपाई यांनी आपल्या भाषणातून ना डॉ रामदासजी आठवले साहेब…
१९४२ ला महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेक नेते अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैद झाल्याने आपण देशासाठी काहीतरी करावे हा विचार शहरातील रत्नम् पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्या मनात होता. त्यातून मग या तरुणांनी भूमिगत होऊन इंग्रजांचा संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार आंदोलन करण्याचे काम भिंगारसह अहमदनगरमध्ये सुरु केले. एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधून बॉम्ब आणला. तो एका महिला क्रांतिकारकाने आपल्या पोटावर ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून भिंगारला आणला. त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली. ब्रिटीशांची गर्दी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे मौजे स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे दिनांक 25/ 12/2022 रोजी.सकाळी रावणगाव मंडल अधिकारी श्री नेवसे.स्वामी चिंचवली येथील गाव कामगार तलाठी जयंत भोसले. गावकामगार तलाठी खरात.राजेगाव गाव कामगार तलाठी आजबे.यांनी स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे बेकायदेशीर मुरमाचे उत्खनन। होत असल्याने याबाबत त्यांनी एक हायवा MH 17. BY 6528.हि दोन .दिवसापासून चिंचोली हद्दीतून बेकायदेशीर मुरूम वाहतूक करत होते या बाबत ऐक हायवा ट्रक ताब्यात घेऊन .S R P f गट नंबर 7 येथे पुढील कारवाई साठी लावण्यात आली आहे. स्वामी चिंचोली या ठिकाणी .सहा ते सात हयवा दहा टायर गाड्या गेली दोन तीन दिवस झाले बेकायदेशीर मुरूम…
शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख :- दि. २४ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना ही सहा महिन्यापुर्वी घडली होती. त्या अनुषंगाने पीडित महिलेच्या फिर्यादीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील भंगार मालाचा व्यापारी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) या आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच सदरील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील आरोपी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) याने बचावासाठी तसेच अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सदरील…
पुणे शहर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत १ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका दाम्प्त्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यात घडली. मंजु दानवे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी ती विहिरीत पडली. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती संतोष बाळासाहेब दानवे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आलं नाही आणि या घटनेत दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १ महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. संतोष बाळासाहेब दानवे आणि मंजु संतोब…
वजन कमी करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. असाच अनुभव विवेक क्षीरसागर आहे. फूडी असणाऱ्या विवेकने 10 महिन्यात तब्बल ४० किलो वजन कमी केलंय, कसा होता हा प्रवास जाणून घेऊया.बदलती जीवनशैली आणि कामाचा ट्रेस या सगळ्यामुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. अशावेळी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्याही डोकं वर करताना. या सगळ्यावर वजन कमी करणे हा एकच रामबाण उपाय ठरतो. पण वजन कमी करणे आणि तो संपूर्ण प्रवास प्रत्येकालाच साध्य करता येईल की नाही हे सांगण कठीण होतं.अशावेळी आपण एकमेकांकडून प्रेरणा घ्यायला हवी. विवेक या तरूणाने 10 महिन्यात ४० किलो वजन कमी करण्याचा टप्पा गाठला आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या प्रवासात…
दौंड: फिनोलेक्स पाईप्स कंपनी ही पीव्हीसी पाईप्स मध्ये भारतात अग्रगण्य असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकत्याच झालेला राष्ट्रीय किसान दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यानंतरचा हा पहिला राष्ट्रीय किसान दिन फिनोलेक्स कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा केला आहे. यावेळी कंपनीच्या विक्री अधिकारी वर्गामार्फत शेतकऱ्यांना फिनोलेक्स च्या नवनवीन उत्पादनांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात फिनोलेक्स शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असेल असा विश्वास निर्माण केला. ख्रिसमसला मोज्यांमध्ये गिफ्ट का दिले जाते? ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत मुलांना गिफ्ट देणारे खरे सांता कोण ? फक्त व्यवसाय हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता गेली 40 वर्षे फिनोलेक्स…