फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशातील सार्वजनिक आरोग्याविषयक प्रश्नावर तोडगा म्हणून मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व तरुण व्यक्तींना मोफत कंडोम उपलब्ध करुन दिले जातील असं मॅक्रॉन यांनी जाहीर केलं आहे. लहान वयामध्येच तरुणी गरोदर होण्याचं प्रमाण फ्रान्समध्ये फार जास्त आहे. त्यावरच तोडगा म्हणून मॅक्रॉन सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागील दोन प्रमुख कारणांपैकी एक कारण हे लैंगिक आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचंही आहे. कुठे आणि कसे मिळणार हे फ्री कंडोम? “ही गर्भनिरोधकांसंदर्भातील छोटीशी क्रांती आहे,” असं राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉन यांनी ही घोषणा करताना म्हटलं. १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम पुरवले जातील असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. प्लाटीज…
Author: mahalokwani
‘केंद्रातील लोकपालच्या धर्तीवर राज्यातही नवीन लोकायुक्त कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री; तसेच मंत्री यांचा समावेश असेल. या विधेयकाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, याच अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मांडणार आहोत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान, लोकायुक्त कायदा नेमका काय आहे? लोकायुक्ताचे अधिकार कोणते? मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार, म्हणजे नेमकं काय होणार? याच विषयी जाणून घेऊ. ▶ लोकायुक्त कायदा काय आहे? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीत २०११ साली केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने देशात लोकायुक्त कायदा लागू केला. लोकपाल विधेयक, २०१३ ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक २०१३ असंही म्हटल्या जातं. भारतात भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे. ज्यामध्ये लोकायुक्तच्या संस्थेची…
चेहऱ्यावरील मुरूमं आणि पुरळ कापराच्या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल घटक हे त्वचेवरच्या मुरूमांना आणि पुरळ घालविण्यासाठी मदत करतात. याशिवाय कापूर तेल रोज उपयोगात आणल्यामुळे अर्थात रोज लावल्याने मुरूमांमुळे चेहऱ्यावर आलेले डाग निघून जाण्यासही मदत मिळते. याचा वास काही जणांना कदाचित सहन होणार नाही. मात्र त्याचा फायदा अधिक आहे. त्यामुळे तुम्ही याचा नियमित वापर करून घ्या. फुटलेल्या टाचांवर रामबाण उपाय थंडीच्या दिवसात किंवा काही जणांना १२ महिने टाचा फुटण्याचा त्रास होत असतो. टाचा फुटल्यावर अधिक प्रमाणात इन्फेक्शनही होते. हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्हाला कापूर तेलाचा उपयोग करून घेता येतो. कोमट पाणी एका बादलीत घ्या आणि त्यात कापूर तेल मिक्स करा. यानंतर त्या पाण्यात…
पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत. गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) : ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही सार्वजनिक मुतारी नसल्यामुळे दौंड शहरात येणाऱ्या व शहरातील लोकांची लघुसंखेची सोय नसल्यामुळे.दौंड शहरामध्ये पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे पन्नास फुटावर असलेली.जुनी पोलीस वसाहत या पोलीस वसाहतीचा सार्वजनीक मुतारी म्हणून वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे येथे अतिशय दुर्गंधी पसरली असून डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोगराईचा मोठ्या प्रमाणात फैलाव होवू शकतो त्यामुळे दौंड शहरामध्ये।सार्वजनीक मुतारीची सोय .नसल्यामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेने नवीन रस्त्यांच्या कामासाठी चार ते पाच मुताऱ्या पाडल्यानंतर पर्यायी सोय केली नाही…
पुणे जिल्हा प्रतिनिधीः – बबनराव धायतोंडे दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 /12/2022/.तहसील कार्यालय दौंड येथे झाली.या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक सरपंच पाच ग्रामपंचायती वरती। विजयी झाले.. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दापोडी या ऐकाच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला तर. पाटेठाण ग्रामपंचायतीची.सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जातीचा न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे . सर्व ग्रामपंचायत मध्ये तुल्यबळ लढती झाल्या सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे देवकरवाडी. तृप्ती दिगंबर मगर (861). दहिटणे. आरती सचिन गायकवाड (716 ) .नांदूर .युवराज बबन बोराटे (765) बोरी भडक कविता बापू कोळपे (1015). लोणारवाडी. प्रतिक्षा निलेश हिवरकर( 560). सर्व भाजपा आमदार राहुल दादा कुल समर्थक .…
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, सिल्लोड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच निल्लोड येथील 11 पैकी शिंदे गटाचे 7 उमेदवार निवडणूक आल्याने येथे शिंदे गटाचा उपसरपंच पदासाठी मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 147 ग्राम पंचायत सदस्य पैकी शिंदे गटाच्या जवळपास 110 ग्राम पंचायत सदस्यांचा दणदणीत विजय झाला. ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे वाजवीत एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी…
सातारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 318 ग्रामपंचायती पैकी 199 ग्रामपंचायतीवर शिंदे फडणवीस सरकारने सत्ता काबीज करून सातारा जिल्ह्यातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला धोबीपछाड दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने एकूण 98 जागांवर सत्ता काबीज केली आहे. तर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून 28 ग्रामपंचायतीवर तटस्थ उमेदवार हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता शिंदे फडणवीस सरकारची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 318 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने 101 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर भाजपने 98 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने 78 ग्रामपंचायतीवर सत्ता…
आपण रोजच्या स्वंयपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतो. पण अनेकदा कळत-नकळत गॅसचा स्फोट होतो आणि नको ते घडतं. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात एका लग्न समारंभात ६ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेला हा पहिला अपघात नाही. अशा घटना या आधीही झाल्या. मात्र, तुमच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसमुळे अपघात झाला तर तुम्ही तेल कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊ शकता, हे तुम्हाला माहित आहे का? याच विषयी जाणून घेऊ.. भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका…
पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे खानवटे तालुका दौंड येथे दिनांक9/12/2022 रोजी सकाळी 7 ते 11या वेळेत जुने ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिराचा कलशरोहन समारंभ ह. भ .प .बालब्रह्मचारी गोविंद महाराज शिंदे त्यांच्या हस्ते संपन्न झाला या मंदिराच्या सभामंडपासाठी व शिखराच्या कामासाठी व कलश बसविण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी .गावात झोळी फिरवून वर्गणी मागितली होती तसेच .या मंदिरासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी दहा लाख रुपये निधी सभा मंडपासाठी दिला आहे. या मंदिराचे बांधकाम हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज चौथे नातू कै..दत्ताजीराव दिनकरराव राजेभोसले सावर्डेकर सरकार यांनी .. 1939 साली बांधकाम । केले होते याच मंदिराचा। जिर्णोध्दार व आज।पाच जोडपे पुजेला बसून होम यज्ञ…