विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील तळागाळापर्यत पक्ष पोहचला असून यावर्षी ३ आक्टोबर २०२३ रोजी हैदराबाद येथे अधिवेशन होणार असल्याने राज्यातील तथा अहमदनगर जिल्हातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची धुरा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले हे समर्थपणे सांभाळत असून संपूर्ण देशातील गावा गावात रिपब्लिकन पक्ष पोहचवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे…
Author: mahalokwani
जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे – बापूसाहेब तांबे जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुका हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला आहे. तसेच शिक्षकांचे अशैक्षणिक कामे, उशीरा होणारे पगार, शिक्षकांची ऑनलाईन ची इतर कामे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करावी. त्रैवार्षिक अधिवेशनात बापूसाहेब तांबे यांनी खंत व्यक्त केली. जामखेड शहरातील नगर रोड येथील साई गार्डन येथे प्राथमिक शिक्षक संघ , गुरुमाऊली व सदिच्छा मंडळ जामखेड तालुका त्रेवार्षिक अधिवेशन वअहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक ,कै.आचार्य दादासाहेब व कै.भा. दा. पाटिल पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते.हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे बुलंद नेतृत्व बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वांखाली व शिक्षकांच्या मोठ्या…
आघाडीची दुचाकी कंपनी Honda Activa स्कूटरची मर्यादित आवृत्ती लाँच केली आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरच्या नवीन आवृत्तीमध्ये दोन रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. तुम्ही अॅक्टिव्हा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही स्कूटरही पर्याय म्हणून ठेवू शकता. Honda Activa ब्लॅक आणि ब्लू स्कूटर सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनीने मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. सणासुदीच्या काळात नव्या एडिशनच्या माध्यमातून स्कूटर्सच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन Honda Activa साठी बुकिंग सुरू आहे आणि तुम्ही देशभरातील Honda Red Wing डीलरशिपवरून ते बुक करू शकता. Flipkart Big Billion Sale 2023: अर्ध्या किमतीत मिळणार मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप तसेच इतर अनेक वस्तूं ; या दिवशी…
वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड शालेय वयात निर्माण होणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हायची असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे,ही गरज ओळखून मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र उपकेसरी श्री.बबन काका काशिद व मित्रमंडळ पुणे,यांनी जि.प.प्रा.सारोळा शाळेच्या वाचनालयास गोष्टीची पुस्तके भेट दिली. या वेळी श्री.बबन काका काशिद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या आधुनिक युगात मोबाईल, सोशल मीडियामुळे एकमेकांतील संवाद संपत चाललेला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहेत.विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा,मुले एकलकोंडी होताना दिसत आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे,वाचनाची आवड जोपासण्यासाठी काय करावे,याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शालेय…
दि. 30: रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वतीने व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी उपयुक्त परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जामखेड साठी रोहित पवार विकासपुरुष – हरिभाऊ बेलेकर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, पंचक्रोशी विद्यालयाचे स्कूल कमिटी अध्यक्ष बाबासाहेब उगले, सुरेश भोसले , वैजिनाथ पोले ,नगरसेवक अमित जाधव, प्राचार्य मडके बिके, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे…
आय एम एस चा मतदार जागृती उपक्रम जास्तीत जास्त युवकांनी मतदार नोंदणी करून निवडणुकीची पहिली पायरी सर केली पाहिजे असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, निवडणूक विभाग अहमदनगर यांनी केले. मतदार नोंदणीची टक्केवारी वाढीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने नगर जिल्ह्यातील कॉलेजमध्ये मतदार जागृती अभियान सुरु असून मुलांना मतदार नोंदणी साठी प्रेरित केले जात आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम आय एम एस या व्यवस्थापन संस्थेत घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी सुधीर पाटील, तहसीलदार निवडणूक शाखा, संगणक विभाग प्रमुख डॉ उदय नगरकर, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ प्रोनोती तेलोरे, अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा सय्यद मुदस्सर, वर्थशिप अर्थ फौंडेशनचे अहमदनगर जिल्हा समन्वयक कांबळे, साक्षी भालेराव, विद्यार्थी…
अहमदनगर (दि २९ सप्टेंबर):-संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील Gautami Patil हिला अहमदनगर जो गणपती विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रम घेतला आहे, तो चांगलाच महागात पडणार आहे, पोलिसांनी गौतमीच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरी पण आयोजक आणि गौतमी पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडला , या कार्यक्रमध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार होता , कारण हा कार्यक्रम रस्त्यावर आयोजित करण्यात आलेला होता . Gautami Patil गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल [better-ads type=’banner’ banner=’5978′ ] गौतमीच्या पाटील Gautami Patil कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते, आणि कर्यक्रमात पण तेच पाहायला मिळाले गर्दी इतकी झाली होती कि एक गाडी रस्त्यावरून निघण्यासाठी ३० ते ४०…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अनंत चतुर्दशी निमित्त जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुक सोहळ्या निमित्ताने नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांचा माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मानाचा श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी रामचंद्र मित्र मंडळ,शिवशांती मित्र मंडळ,राजे शिवाजी युवा मंच, जयहिंद,विश्वक्रांती शिवशक्ती,वीरराजे, वस्ताद सत्ता, पृथ्वीराजे, शंभूराजे, जनविकास सेवाभावी संस्था, धर्मवीर, योध्दा, महासंग्राम , कान्होपात्रा,एस टी कामगार, जामखेड नगर परिषद कर्मचारी, महाराजा,तांडव, हनुमान, सिध्दीविनायक (मार्केट यार्ड), वक्रतुंड, सावतामाळी, जाणता राजा, रूद्राक्ष यांसह अनेक गणेश मंडळांचे नगरसेवक अमित…
Flipkart Big Billion Sale ची 2023 सुरवात लवकरच सुरु होणार आहे, या सेल मध्ये मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, तसेच इतर अनेक वस्तूंवर भरघोष सवलत देण्यात येणार आहे, फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे , यामध्ये विविध वस्तूंवर फार मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येणार आहे. ऐन सना सुदिच्या काळात काळात फार मोठा सेलला फ्लिपकार्ट लवकरच सुरवात करणार आहे. Flipkart Big Billion Sale 2023 Flipkart Big Billion Sale 2023 फार मोठ्या प्रमाणावर या सेल मध्ये वस्तूंची विक्री होणार आहे, अशी आशा फ्लिपकार्टने व्यक्त केली आहे, कारण आत्ता अनेक सण येत आहेत, तसेच काही दिवसानंतरच सर्वात मोठा सन म्हणजे दिवाळी येऊ घातली आहे,…
धनराज पवार जामखेड तालुक्यातील साकत येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 2005/06 साली आर आर बी कंपनीला पवनचक्की उभारण्यासाठी दिल्या होत्या. या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला रोजगार मिळणार होता परंतु कंपनीने शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात जमिनी घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारला नाही, त्यामुळे रोजगार मिळाला नाही त्या जमिनीचा कर ही भरला गेलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी शासन जमा झाले आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले कारण कि रोजगाराची संधी उपलब्ध होईल या उद्देशाने जमिनी दिल्या. परंतु जमिनीही गेल्या व रोजगारही नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत .काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपनीने पवनचक्य्या उभ्या केल्या व काही कालावधीनंतर त्या…