जामखेड प्रतिनिधी धनराज पवार Manipur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मणिपूर घटनेचा निषेध केला देशातील मणिपुर Manipur सारख्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता आहे. घरे जाळली जात आहेत. माणसे मारली जात आहेत. त्यावर कळस म्हणून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली जात आहे. आणि सारा देश हे षंढा सारखे मोबाईल मध्ये पाहत आहे. या देशाचे पंतप्रधान-गृहमंत्री हे मूग गिळून शांत आहेत. कसले हे राजकारण कसले हे समाजकारण एवढा लाजिरवाणेपणा घेऊन जगणे हे षंढाचे लक्षण आहे. स्त्री ही कोणाचीही असो तिचा एवढा अपमान/ अवमान उघड्या डोळ्याने पाहावत नाही आम्ही सर्व त्या असाह्य महिलेसोबत आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही रास्त्यावर येणार.…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दिनांक 20/07/2023 वार गुरुवार रोजी जामखेड तालुक्यातील मोहा फाटा ( समता भुमी) येथील निवारा बालगृह येथे पै.प्रविण करडकर यांनी त्यांच्या वाढदिसानिमित्त निवारा बालगृह जामखेड येथे भेट देऊन आपला अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत अनाथ, निराधार, गोरगरीब मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बालगृहातील सर्व स्टाफ व लहान लहान मूल / मुलींनी प्रविण दादा यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं त्यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी प्रविण दादांच्या विचारांना मान देऊन त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी मित्र- युवा नेते मा.कृष्णा डुचे, म.पो संदीप सांगळे, महेश पवार, अनिल ठाकरे, अजय वाकळे, कांतेज समुद्र,आबासाहेब जाधव,शंकर डूचे,…
Teacher| प्राध्यापक भरती अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेमध्ये 2 हजार 900 प्राध्यपक Teacher भरतीच्या मुलाखती तीन दिवसात घेतल्याचा आरोप अतिशय बिनबुडाचा व दिशाभूल करणारा आहे . या संस्थेत 14 विषयाची जाहिरात होती व 49 प्राध्यापकाच्या जागा भरायच्या होत्या . यासाठी 2 हजार 900 अर्ज आले होते हे खरे आहे . परतू एकच उमेदवाराने एकच वेळी वेगवेगळ्या संवर्गातून तीन तीन अर्ज केल्या मुळे ही संख्या फुगली होती . प्रत्यक्षात मात्र फक्त 936 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत . या मुलाखती तीन दिवस चालल्या आहेत एकाच वेळी चौदा विषयाच्या मुलाखती वेगवेगळ्या चौदा कक्षात सुरु होत्या . तीन दिवस चाललेल्या मुलाखती मध्ये प्रत्येक विषयाला सरासरी…
Nagar ओढे-नाले रस्ते गायब नगर : नगर Nagar मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे, तसेच नगर शहरात ताबा टोळी पण सक्रिय आहे, यानंतर आता नवीन टोळी या शहरात उदयास येताना दिसत आहे, नगर शहारातील मुख्यतः सावेडी उपनगरातील ओढे- नाले नास्तानाभूत होताना पाहायला मिळत आहे, पूर्वी या ओढ्याची लांबी रुंदी हि एखाद्या नदी प्रमाणे पाहायला मिळत होती, आता हे नालेच पाहायला मिळत नाहीत, जे शिल्लक आहेत त्यांची लांबी रुंदी मोजण्या जोगी राहिलेली नाही. आता पावसाचे दिवस आहेत , नगर Nagar महानगर पालिकेने ओढे नाले साफ सफाई साठी लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यांचे बिले हे काढले आहेत, मंग जर शहरात…
Raigad Irsalvadi दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून घेतला आढावा रायगडातील इर्शाळवाडीमध्ये Raigad Irsalvadi घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील…
Rajpal राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात वस्त्रउद्योगात नावाजलेले नाव म्हणून राजपाल यांच्याकडे पाहिले जाते, अल्पावधीत त्यांनी आपल्या कपड्यांची क्वालिटी आणि अल्प दरात सामान्य लोकांसाठी मनमूराद खरेदी करता यावी यासाठी मान्सून सेल लावला आहे, वस्त्र क्षेत्रात राजपाल Rajpal हे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत,राजपाल या दालनात सालाबादप्रमाणे याही वर्षी पावसाळी सेलचे आयोजन केले आहे. अहमदनगर, संगमनेर येथील वस्त्रदालनातील सेलला ग्राहक वर्गातून उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आनंद कटारिया व सोनू राजपाल यांनी दिली. अहमदनगर आणि संगमनेर येथील राजपाल मध्ये मान्सून सेलला सुरुवात 30 ते 70 टक्के पर्यंत डिस्काउंट ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद pic.twitter.com/SVR4sPIgjU— Mahalokwani (@mahalokwani) July 20,…
Ahmednagar अहमदनगरमध्ये जमिनीचा महाघोटाळा अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ जुलै):-खोटे कागदपत्र तयार करुन,जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केल्या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,सहाय्यक दुय्यम निंबंधक नगर Ahmednagar ,तहसिलदार,तलाठी,मंडळ अधिकारी,यांच्यासह 32 खाजगी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कामगिरी केली आहे.बातमीतील हकीगत अशी की,दि.३/१ २००६ रोजी पूर्वी ते दि.६/१/२००६ रोजी मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर, गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर,३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दोन खोल्यांच्या कामाचे भूमिपूजन करतांना आकाश बाफना वडीलांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आज रोजी जामखेड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद चे चेअरमन दिलीप बाफना यांचे पूत्र आकाश बाफना यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदर्श फाउंडेशन च्या वतीने जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील अनाथ,निराधार, बालकांमध्ये जावून त्यांना आनंद देत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. कुमारी क्रिषा आकाश बाफना हिच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, मोहा फाटा (समता भूमी) ता-जामखेड जि- अहमदनगर येथे मुले व मुलींचे वसतिगृह येथे मुलींना राहण्यासाठी खोली बांधून देण्याचे आश्वासन…
धनराज पवार JAMKHED या कृषी महाविद्यालयात टँकरने पाणीपुरवठा जामखेडJAMKHED तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाचा परिसर जवळ पास १०० एकर आहे. १०० एकर शेती कायमस्वरूपी प्रयोगासाठी उपयोगात आणण्यासाठी साधरण १० इंच आकाराची कायमस्वरूपी जलस्त्रोत असलेल्या ठिकाणावरून पाईप लाईन करणे आवश्यक आहे . वाचा जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार आज रोजी चक्क पावसाळ्यात या कृषी महािद्यालयाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे आणि या वर कृषी महाविद्यालयं चालणार असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. येथे पाणी उपलब्ध करण्यासाठी तात्पुरते पर्याय शोधले असतीलही मात्र त्या मधुन समस्या सुटण्याची शक्यता अजिबात नाही तरी यावर जे कायम स्वरुपी पर्याय आवश्यक…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड ( जि. अहमदनगर) : जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव…