KTM ने भारतात 200 Duke ची सुधारित मॉडेल रु. 1.96 लाख (एक्स-शोरूम) लाँच केली. अपडेटचा एक भाग म्हणून, मोटरसायकलला एक LED हेडलॅम्प मिळतो, जो KTM 250 Duke आणि 390 Duke मॉडेल्ससारखाच आहे. याशिवाय, KTM 200 Duke 2023 मध्ये दोन नवीन पेंट स्कीम मिळतात: इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि डार्क सिल्व्हर मेटॅलिक. डिझाइननुसार, नवीन हेडलॅम्प व्यतिरिक्त कोणतेही महत्त्वपूर्ण बदल नाहीत. मोटारसायकल मागील मॉडेल पुढे नेते. याशिवाय, मॉडेलने जुन्या मॉडेलमधून अंडर-बेली एक्झॉस्ट, 17-इंच अलॉय व्हील्स, स्प्लिट-स्टाईल सीट, एक इंजिन काउल, 13.4-लिटर इंधन टाकी आणि बरेच काहीया नवीन मॉडेल मध्ये आहे. तुम्ही 2023 KTM 200 Duke खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, त्याची वैशिष्ट्ये, चष्मा आणि…
Author: mahalokwani
राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार पाच दिवसांत तो संपुर्ण राज्यात दाखल होईल. शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु झाला होता. शनिवारी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर या भागात पाऊस झाला आहे. हलक्या सरी कोसळत असून अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao dakh यांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून आता राज्यातील बऱ्याचशा शेतकरी सुखावला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस धो-धो पावसाचे अंदाज वर्तविले असून कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे सातारा नाशिक भागात सुध्दा मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता…
अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन. Mansoon बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत, अहमदनगर जिल्ह्यात माघील काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची Mansoon आतुरता लागलेली होती, महाराष्ट्रात साधारणतः 10 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असते परंतु या वर्षी मान्सूनचे आगमन Mansoon होणार त्याच कालावधीत चक्रीवादळ दाखल झाले त्यामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला असे, सांगण्यात येथे, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज दिनांक 24 जून 2023 मान्सूनच्या हलक्या Mansoon सरी पडल्या आहेत, #मान्सून #आगमन#अहमदनगर pic.twitter.com/wII1wKs5wO— Mahalokwani (@mahalokwani) June 24, 2023 मान्सून mansoon Alert जरी दाखल झाला असला तरी यामध्ये पडणाऱ्या मान्सून पावसामुळे मात्र लगेच शेतकऱ्यांना पेरण्या करता येणार नाहीत, कारण अजून पावसाची गरज आहे, आज…
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तलाठी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना येत्या 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी एकूण २२ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 जुलै रोजी शेवटची तारीख असणार आहे. तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने…
जामखेड प्रतिनिधी:धनराज पवार जामखेड शहरातील आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे सोमवार दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दुपारी १२.३० वाजता जातीचे दाखले वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोमवारी २६ जून रोजी श्री गोरोबा चित्र मंदिर येथून ते आदित्य मंगल कार्यालय, येथे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली नंतर आदित्य मंगल कार्यालय (बीड रोड) येथे तसेच जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात येणार आहे . जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड येथे दि. २४ मे रोजी झालेल्या एका विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जामखेड ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ जून रोजी जामखेड पोलिस स्टेशन व जामखेड तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे शुक्रवारी जामखेडमध्ये पडसाद उमटले. या घटनेचा निषेध नोंदवत शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमरभाई कुरेशी, नगरसेवक दिगांबर चव्हाण, अमित जाधव, प्राचार्य विकी घायतडक सर, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले आदींची भाषणे झाली. या बाबत घटनेची माहिती अशी की,जामखेड येथे दि. २४ मे २०२३ रोजी झालेल्या जामखेड येथील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर एका नराधम…
मुख्य आरोपी गणेश उचे आणि बोराटे पुण्यातून ताब्यात ओमकार गामा भागानगरे खून प्रकरण अवैध धंद्यांची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा नगरे यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. गणेश उचे नंदू बोराटे अशी त्यांची नावे आहेत दरम्यान काल मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्यातील संदीप घोडा प्रसार आहे. ओंकार भागानगरे ओंकार घोलप आणि इतरांनी सोमवार दिनांक 19 जून रोजी दुपारी गणेश उचे यांच्या अवैध धंद्यांची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावरून कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात उचे आणि भागानगरे घोलप यांच्यात वाद झाले त्याच रात्री बालिकाश्रम रस्त्यावर…
शेतकरी दरवर्षी शेतीसाठी अनेक राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका कडून कर्ज घेतात.मात्र शेतकऱ्यांना विहित मुदतीत कागदपत्रं पूर्तता करता येत नाही, पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रं मिळवता येत नाहीत परिणामी ते पीक कर्जापासून वंचित राहतात, खाजगी सावकारांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घेऊन कर्ज बाजारी होतात. जिल्हा बँके कडून घेतल्या जाणार्या कर्जाचे प्रमाण हे सर्वाधिक असते.सहकारी बँकेकडून ग्रामीण भागात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत शेतीसाठी कर्जाचे वितरण केले जाते. अनेक शेतकरी हे नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे तसेच ईतर कर्ज घेतात. हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच ईतर अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. अनेक…
कर्जत / जामखेड | सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. “जय हरी विठ्ठल” या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर वर्षी या उत्सवात सामील होतात. अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्वच पालख्या व दिंड्या आणि त्यात सामील झालेल्या वारकऱ्यांची आरोग्याशी संबंधित असलेल्या विविध अडचणी सोडवण्याच्या हेतूने आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पालखीच्या विविध मार्गावर करण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. तसेच विविध भागातून हजारो वारकरी या…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारअमृत जवान योजनेअंतर्गत आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयामध्ये सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी सायली सोळंके मॅडम, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे , कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, महावितरणचे उप अभियंता योगेश कासलीवाल, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर गुंजाळ वरिष्ठ लिपिक अंकुश हांडे, जामखेड तालुका माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके, ज्येष्ठ माजी सैनिक शिवाजी गाडेकर उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिकांच्या विविध तक्रारी निवारण करण्याचे आश्वासन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्काॅर्डनलिडर विद्याधर कोरडे यांनी…