राज्यातील अनेक धरणांमध्ये आणि तलावांमध्ये पाणीसाठा आता काही दिवसांचाच उरला आहे. अशातच मान्सूनचा Mansoon प्रवास संथगतीने होत असल्याने चिंता वाढली आहे. पण आता हवामान विभागाने दिलासा देणारी अपडेट दिली आहे. मुंबईमध्ये अखेर पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळालेल्या असला तरी शहरात अजूनही मान्सून Mansoon दाखल झालेला नाही. Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असून, १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळ अरबी समुद्रात अत्यंत हळूवारपणे पुढे सरकत असल्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांना चालना मिळत नसल्याचे दिसत आहे. Mansoon मान्सून राज्यात ११ जूनला दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रवासात अद्याप फार प्रगती झालेली…
Author: mahalokwani
धनराज पवार: महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित, सहायक आयुक्त कार्यालय, अहमदनगर अंतर्गत, अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर, जामखेड येथे गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी ‘प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा’ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील होते.तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , राहुल गांगुर्डे (लेखाधिकारी सहायक आयुक्त समाजकल्याण अहमदनगर ), नगरसेवक मोहन पवार ,काॅन्स्टेबल अडसूळ, गर्जे सर, वाघमारे सर होते. शाळेच्या मुख्याध्यापिका, अधीक्षक व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामनव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची खासगी कृषी उत्पन्न…
वेअरेबल ब्रँड बॉटने कमी किमतीत एक नवीन परवडणारे घड्याळ boAt SmartWatch बॉट अल्टिमा कॉल लाँच केले आहे. या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये कंपनीने ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉट ब्रँडच्या या घड्याळाची किंमत अतिशय परवडणारी आहे, आम्ही तुम्हाला या नवीनतम घड्याळाची भारतातील किंमत आणि या स्मार्टवॉचमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती सांगणार आहोत. बॉटने boAt SmartWatch ने आपल्या नवीनतम ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचची किंमत 1699 रुपये निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टवॉचची विक्री 19 जूनपासून ग्राहकांसाठी Amazon वर सुरू होईल. तुम्ही हे घड्याळ काळा, निळा, चांदी (धातूचा पट्टा) आणि गुलाबी रंगांमध्ये खरेदी करू शकता. स्क्रीनबद्दल…
सन 2020 पासून पुढील या जैविक महामारीच्या माध्यमातून शासनाने केलेले लॉकडाऊन व तेव्हापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे आलेली मरगळ व त्यामुळे तोट्यात चाललेले परिवाहन महामंडळ यांनी आपल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या. दैनंदिन कामकाजासाठी तसेच उच्च माध्यमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यमातील पारनेर शहरात असणाऱ्या शाळा व त्या शाळेत शिकणारी विद्यार्थी तसेच पारनेर शहरात असणारे तालुक्यातील तहसील पंचायत समिती कोर्ट -कचेरी यासारखे मध्यवर्ती शासकीय कार्यालयात खेड्यापाड्यातून पारनेरशी दैनंदिन नाळ जोडलेले सर्वाधिक प्रवाशांना तसेच उद्योगधंद्यासाठी आपला व्यवसाय बंद करून आपल्या स्वगृही जाण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांना व रात्रीच्या वेळी इतर जिल्ह्यातून येणारे ग्रामस्थ यांना या…
जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीन आजी- माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी जामखेड येथे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी अधिकारी, भुमी अभिलेख अधिकारी , गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक साहेब, व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या व जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहामधे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व माजी सैनिक,आजी सैनिक, वीरमाता,वीरपिता,शहिद परिवार,वीर पत्नी या सर्वांनी उपस्थित राहुन आपल्या अडीअडचणी समंधीत अधिकाऱ्या समोर मांडाव्यात जेने करून प्रशासनाच्या वतीने त्या दुर करण्यासाठी या तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आजी माजी सैनिकांनी मोठ्या…
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : खानवटे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. जिद्द आणि चिकाटी या बळावरती आपण काहीही करू शकतो, महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय (Neet) परीक्षेत कु. शिवानी उमाकांत कोरे हिने 720 पैकी 578 गुण प्राप्त करून खानवटे ता. दौंड Daund जि. पुणे येथील प्रथम MBBS या क्षेत्रातील पदवी घेणारी ती विद्यार्थिनी ठरली. अतिशय हालाखीच्या परिस्थितीमधून तिने हे यश प्राप्त केले आहे. लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपलेले परंतु परिस्थितीशी झुंज देत आज तिने हे यश संपादन केले. पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे ता. दौंड Daund येथे झाले. आता तिला MBBS करायचे आहे. तर पाचवी ते…
नमस्कार शेतकरी मित्रानो , आज दिनांक 14 जून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मान्सून हा कुंपवत झाला आहे चक्रीवादळाचा परिणाम मान्सून वर झाला आहे असे panjabrao Dakh सांगितले आहे. पण आता पाऊस कधी पडणार हे जाणून घेऊया 22 तारखे पासून राज्यात पाऊस असे भाकीत panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक ,पालघर , मुंबई , सातारा , सांगली , पुणे या भागात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे . हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे . तरी शेतकऱ्यांनी पेरणीची…
दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक थॉमसनने Flipkart फ्लिपकार्टवर नवीनतम डिस्काउंट ऑफर सादर केल्या आहेत. फ्लिपकार्ट बिग डेज सेव्हिंग सेलमध्ये, तुम्ही थॉमसनचा स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन, कूलर किंवा एसी अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता थॉमसन स्मार्ट टीव्ही: 32 इंच ते 75 इंचापर्यंतच्या स्मार्ट टीव्हीवर फ्लिपकार्टवर Flipkart उत्तम सूट मिळत आहे. थॉमसनचे स्मार्ट टीव्ही बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये 6,499 रुपयांपासून 79,999 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कंपनी 75 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 46% सूट देत आहे. थॉमसन कूलर: थॉमसनने नुकतीच एअर कूलरची नवीन श्रेणी लाँच केली आहे. यामध्ये वैयक्तिक, विंडो आणि डेजर्ट एअर कूलरचा समावेश आहे. फ्लिपकार्ट Flipkart सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटनंतर हे एअर कूलर 4,999 रुपयांपासून…
मारुती सुझुकीच्या maruti suuzki वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते की, आम्ही सादर करणार असलेले नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असेल भारत देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी maruti suzuki मारुती सुझुकी मोठ्या तयारीत आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 5 जुलै रोजी आपली नवीन कार मारुती एंगेजचे (Engage) अनावरण करणार आहे. कंपनीने देऊ केलेली ही सर्वात महागडी आणि लक्झरी कार असेल. मारुतीची( maruti) ही आगामी कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. नुकताच एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये ही कार लक्झरी असेल असे सांगण्यात आले आहे. मारुतीची ही आगामी MPV इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल, जसे…
सरकारी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी कांदा भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे विक्रीसाठी शेतकरी येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातून तो शेतकरी सावरतो ना सावरतो तेवढ्यात सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाहीत. सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहेत. खासगी बाजार समितीत कांदा आवक जास्तखाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती 300 रुपयापासून 1100 रुपयापर्यंत कांदा दर दिला जात आहे. सरकारी…