गेल्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे घेण्यात आलेल्या MHT CET या परीक्षेचा निकाल 12जून 2023 रोजी लागला असून या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणेच घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत अर्पिता दायमा ला 99.94, सृष्टी वायकर ला 99.79 तर सुमित सांगळे याला 99.56 गुण (PCTL) मिळाले आहेत.90 पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 25 पेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षीही या परीक्षेत श्री सांदीपणी अँकॅडमीच्या विद्यार्थांनी प्रचंड यश मिळवले होते. 2015 साली संस्थेचे संस्थापक श्री के बालराजू सर यांनी 3 विद्यार्थ्यां पासून सुरुवात केलेल्या या छोट्याशा रोपट्याचे आज विशालकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. JEE MAINS परीक्षेत…
Author: mahalokwani
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ जुन):-आमदार श्री.राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जिवे ठार मारण्याची धमकी देणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, बातमीची हकिगत अशी की, दि.३०/०५/२०२३ रोजी श्री. अमित अरुण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी,ता.जामखेड येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी करीत असताना त्यांचे मोबाईलवर सागर गवासणे याने मोबाईलवर फोन करुन तुम्ही राम शिंदे साहेबांचे जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी व फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी जामखेड पोलीस…
मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियसी ही अहमदनगर येथे काही दिवस वास्तव्यासाठी होती, आरोपीने अहमदनगर येथील मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग…
नगर – अहमदनगर महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक विनित पाउलबुधे यांच्या पत्नी सौ.सुजाता विनित पाउलबुधे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 45 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दुपारी अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व.सुजाता पाउलबुधे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व उद्योजक देवदत्त पाउलबुधे यांच्या त्या भावजयी होत. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटायला गेली. पतीला पाहताच ८ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे. ही महिला ८ महिन्यांची गर्भवती असून येत्या २० दिवसांनी २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. दीराने वहिणीच्या मृत्यूसाठी पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहात या महिलेचा पती असल्याची माहिती आहे. भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात ६ जून रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि पल्लवी ही ८ महिन्यांची…
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे, समान मते असतांना सभापती आणि उपसभापती हे भारतीय जनता पक्षाचे झाले, यामध्ये आमदार राम शिंदेचा जादुई करिष्मा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कर्जत – जामखेड या मतदार संघात राम शिंदेंचे वर्चस्व प्रस्थापित होतांना दिसत आहे. मतदार राम शिंदेंना पसंती देतांना पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात या सर्व बाबींचा राम शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचे गटाचे…
अहमदनगर :- अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी अशोक कडूस , अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र , वरिष्ठ सहायक विजय थोरात यांना त्वरीत निलंबीत करून दि. २६ / ६ /२३ पर्यंत कायदेशीर कारवाई करा अन्यथा दि.२६ /७ /२३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रार राजेद्र शिंदे यांनी दिला आहे. दि.१८ / ५/२३ रोजी मा. मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणविस , शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकजी केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की तकारदार यांनी मंत्रालय पातळीवर सर्व अधिकारी वर्ग ते खालील शिक्षण आयुक्त , शिक्षण संचालक , उपसंचालक अदि. ना वेगवेगळ्या मुद्यांसह व पुराव्यासह जवळ जवळ…
ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन मूग गिळून बसलय. इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व डोक्यावर घेऊन नाचणारे शिवभक्त आज शिवरायांची शिकवण विसरलेत असच म्हणावं लागेल. लोकशाहीचा चौथा मानला जाणाऱ्या पत्रकारितेला तर काही पत्रकारांनी काळिमा फासलीय. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांनी आपली लेखणीच गहाण ठेवलीय, एवढी मोठी घटना घडून सुद्धा हे गप्प बसले आहेत. जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या पिडीत विद्यार्थ्यीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला…
तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळते. जयराम बानन यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही, त्यांनी स्वत:च्या हिमतीवर सागर रत्न रेस्टॉरंटला प्रसिद्ध खाद्यपदार्थ बनवले. आज त्यांचा व्यवसाय 300 कोटींहून अधिक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयराम बानन यांचे देशभरात 60 हून अधिक आउटलेट आहेत. सागर रत्न रेस्टॉरंट हे लोकांच्या खाण्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. हे रेस्टॉरंट दक्षिण भारतीय जेवणासाठी खूप लोकप्रिय आहे. जयराम बानन यांनी सागर रत्न रेस्टॉरंटची स्थापना कशी केली आणि नवीन यशोगाथा कशी लिहिली हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जयराम बानन यांचा जन्म कर्नाटकातील उडपी येथे झाला. त्यांना वडिलांची खूप भीती…
नगर शहराचा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे कलम 37 1 व 37 3 नुसार 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्ह्यात सभा महासभा आंदोलने आणि जातीय संवेदनशील वातावरणामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी एकोणावीस जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडके, बंधूका, आधी वस्तू बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना त्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही