Jamkhed जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापकांची आढावा बैठक दिनांक २२ जुलै रोजी जामखेड Jamkhed येथे संपन्न झाली. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी जामखेड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सह विचार सभा व आढावा बैठक घेतली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात ही अढावा संपन्न झाली.

यावेळी बोलतांना जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विद्यार्थांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यात यायला हवे. जसे प्रज्ञाशोध परीक्षा, व इतर स्काॅलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाल्यास त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल.

या प्रसंगी जामखेड गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी सांख्यिकी कैलास खैरे,केंद्र प्रमुख सुरेश मोहिते सर, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष दशरथ कोपनर सर व मुख्याध्यापक संघाचे सचिव शिरसाट सर, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर,प्रा. संजय वराट सर, दत्तात्रय काळे सर,रमेश अडसूळ सर, बाळासाहेब पारखे सर, श्रीधर जगदाळे सर,प्रा. जाकीर शेख सर, कोळी भाऊसाहेब, आदी मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.

जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा सत्कार करतांना गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब समवेत विस्तार अधिकारी, सांख्यिकी कैलास खैरे, केंद्र प्रमुख सुरेश मोहीते सर,युवराज ढेरे
जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना ,अहमदनगर आदी
