Author: mahalokwani

जामखेड महाविद्यालच्या बोगस सचालक मंडळाच् गलथान पणा उघड.. जामखेड : शिक्षण विभागाने पुन्हा एकदा जामखेड Jamkhed महाविद्यलयाला दणका दिला आहे, संस्थेच्या बोगस सचालक मंडळाच्या गलथान पणा मुळे हि नामुष्की जामखेड महाविद्यालयालवर ओढवली आहे, असेच म्हणता येईल . जामखेड महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या 19 जागा पैकी 8 जागा भरण्याची परवानगी मिळालेली असताना . संस्थेच्या बोगस सचालक मंडळाच्या गलथान पणा मुळे ही नोकरभरती रद्द झाली असून दि. 24 जुलै च्या शासन निर्णया नुसार या आठ जागा आता स्वायत्त महाविद्यालयाला वर्ग करण्यात आल्या आहेत . पंधरा ते विस वर्ष तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकावर अन्याय झाला आहे त्याच बरोबर विद्यार्थ्यावर सुद्धा अन्याय झाला असून…

Read More

आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा आमदार रोहित पवार यांनी केलेल्या MIDC मंजूर व्हावी, यासाठी काल विधानभवना समोर बसलेल्या आंदोलन प्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत जामखेड Jamkhed मतदारसंघात उमटू लागले आहेत. आमदार रोहित पवारांविरोधात मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. आमदार रोहित पवार हे कोणत्या घमेंड मध्ये बोलत आहे, असा प्रश्न भाजपाच्या वतीने विचारण्यात येत आहे, आम्हाला पण अशी भाषा करायला जमते, तुम्ही बारामती मधून येऊन असे वक्तव्य करीत असताल तर आम्ही हे खपवून घेणार नाही येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर देण्यास भाजपा तयार आहे जामखेड Jamkhed भाजपच्या वतीने आज रोजी शहरातील खर्डा चौक…

Read More

कर्जत तालुक्यात MIDC मंजूर व्हावी म्हणून आ.रोहित पवार हे काल मंत्रालयाच्या परिसरामध्ये उपोषणाला बसले होते परंतु मागील सरकारमध्ये सत्तेत असताना देखील त्यांना एमआयडीसी मंजूर करता आली नाही परंतु आज विरोधात असल्यामुळे आपल्याला आलेल्या अपयशाचे खापर हे सत्ताधाऱ्यांवर कसे फोडावे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न रोहित पवार यांनी केलेला दिसतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सत्तेत असताना देखील त्यांना ते करता आले नाही आणि याचे खापर ते आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्यावर फोडत आहेत. स्वतः हळगाव येथे असलेल्या साखर कारखान्यातील कित्येक युवकांना कामावरून काढून बेरोजगार केले आहे आणि आज तरुणांची दिशाभूल करत त्यांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. म्हणूनच त्यांना आलेल्या या…

Read More

अहमदनगर:- मणिपूर manipur येथील आदिवासी महिलांवरील अमानवीय अत्याचार करणाऱ्यावर फाशीची शिक्षा आणि मणिपूर मुख्यमंत्री यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.जालिंदर घिगे यांच्या नेतृत्वाखाली, राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नियोजन पंकज खर्डे यांनी केले होते.यावेळी वंबआ जिल्हा महासचिव योगेश साठे,शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर जिंदम,गणेश तडवी, देविसिंग पाडवी,विलास तडवी,उमेश तडवी,मगण वसावे आदीसह अन्य आदिवासी जमातीचे विद्यार्थी उपस्थित होते. मणिपूर manipur राज्यामध्ये भाजप सरकारने मैतेई जमातीला आदिवासी आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कूकी व नागा या मूळ आदिवासी जमातींचा संतप्त प्रतिक्रियेनंतर मागील…

Read More

धनराज पवार शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या…

Read More

धनराज पवार जामखेड येथील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये भव्य लकी ड्रॉ ऑफर जामखेड शहरातील बीडरोड काॅर्नर,येथील आष्टेकर मोबाईल शाॅपी येथे १९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बजाज फायनान्स कंपनी व आष्टेकर मोबाईल शाॅपी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लोन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आयोजकांना आवाहन केले होते की,कोणताही स्मार्टफोन खरेदी करा आणि ३ महिन्या पर्यंत चा मोबाईल रिचार्ज मोफत त्याच बरोबर भव्य लकी ड्रॉ ऑफर २ भाग्यवान विजेत्यांना ब्रेंडेड सायकल जिंकण्याची संधी.‌ आज रोजी दुपारी १२ वाजता लकी ड्रॉ सोडत ऑफर‌ घेण्यात आली, कु.श्रीतेजा सागर आष्टेकर , श्रीकर सागर आष्टेकर, यांनी चिठ्ठी काढून भाग्यवान विजेत्यांना १) सचिन धोंडे, जामखेड,…

Read More

धनराज पवार जामखेड येथे रविवार दिनांक २३ जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे खर्डा चौकात जोरदार स्वागत स्वागत करण्यात आले , पक्ष वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जण स्वराज्य रॅलीचे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज राष्ट्रीय समाज हा कार्यकर्त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही रथयात्रा करतोय त्या माध्यमातून जागृती करण्याची भूमिका आहे . आता मी एनडीए मध्ये आहे आपल्याला आपला पक्ष वाढवला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला काय वाटते हे जाणून घेणे महत्वाचे असते मी स्वतः परभणीतून लढणार आहे माढ्यातून लढणार आहे बारामतीतून तयार केलेले आहे आणि मी आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपला…

Read More

कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा व जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमदार रोहित पवार यांचा लढा कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन! कर्जत जामखेड ची जनता व युवांवर होणारा अन्याय थांबून तात्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू होता याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते. परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण…

Read More

Jamkhed जामखेड ल.ना.होशिंग विद्यालय येथे मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापकांची आढावा बैठक दिनांक २२ जुलै रोजी जामखेड Jamkhed येथे संपन्न झाली. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी जामखेड तालुक्यातील मुख्याध्यापकांची सह विचार सभा व आढावा बैठक घेतली. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयातील ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात ही अढावा संपन्न झाली. यावेळी बोलतांना जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विद्यार्थांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यात यायला हवे. जसे प्रज्ञाशोध परीक्षा, व इतर स्काॅलरशिप स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाल्यास त्यांच्या शैक्षणिक…

Read More

Amravati अमरावती जिल्ह्याला पावसाचा हाहाकार; राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. अमरावती Amravati जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. बुलढाणा, अमरावती Amravati यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. Ahmednagar crime| अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज सुरू; महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.! अमरावती Amravati जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठं…

Read More