श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी वार्षिक स्नेहसंमेलन उडान -२०२३ उत्साहात संपन्न आष्टी प्रतिनिधी – गोरख मोरे आष्टी येथील श्री. छत्रपती, शाहू , फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन उडान-2023 शनिवार दि.12.05.2023 रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भिमराव धोंडे साहेब हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजयदादा धोंडे, श्री. अभयराजे धोंडे, प्शासन अधिकारी डॉ.डि बी. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथीं यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहसंमेलन निमित्त महाविद्यालंतर्गत घेण्यात…
Author: mahalokwani
जामखेड । धनराज पवार जामखेड शहरातील खर्डा चौक येथे शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज रोजी सकाळी ११.०० वा.जामखेड तहसिल कार्यालय चे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. मागील काही वर्षापासून जामखेड येथे शेतकरी नेते मंगेश दादा आजबे यांच्या पुढाकारातून जामखेड येथे करण्यात येते.सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन फटाक्यांची व तोफांची आतिषबाजी कार्यकत्यांनी केली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील,आयोजक मंगेश दादा आजबे, बावी सोसायटी चे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,बजरंग मुळे, डाँ,कैलास हजारे, प्रताप…
मुंडेंच्या अटकेसाठी अधिकारी, कर्मचारी आक्रमक सदरील व्यक्तीस तात्काळ अटक न केल्यास बीड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी तीव्र आंदोलन उभा करतील, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. तर 15 मेपासून लेखणीबंद आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या निवेदनावर जि.प. लेखा विभाग कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटनांच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा..
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेस’ पक्षाने दणदणीत विजय संपादन करून एकहाती सत्ता मिळवली असून, सत्ताधारी ‘भाजपा’चा सुफडा साफ केला आहे.कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाचा विजय ही देशातील परिवर्तनाची नांदी ठरेल व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी ‘बजरंग बली,राहुल गांधी, प्रियंका गांधी, गँस टाकी’ चे पोस्टर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज झळकावत जोरदार घोषणाबाजी केली.तसेच फटाक्यांची आताषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये कामगार काम करत असताना लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे ,वय ४५ घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मूलानी ,वय ३५ रा तेरखेडा. ता कळंब आशा दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी जामखेड येथील नगररोड वरील सावळेश्वर ट्रॉक्टर च्या मागिल बाजुस मालक पंकज शेळके यांचा रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटर चे उत्पादन करण्याचे (आग विझवण्याचे साधन) चे दोन वर्षापासून गोडाऊन आहे. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊन मध्ये आज…
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार जामखेड येथे आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा आज जामखेड येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आले असता खर्डा चौक येथे उन्हाची काहिली वाढली असतानाही भर उन्हात सत्यजीत तांबे यांचे जामखेड काँग्रेस व युवा काँग्रेस कडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष शहाजी राजे भोसले,प्रदेश युवा सरचिटणीस राहुल उगले,विशाल डूचे,अवधूत पवार, अमोल गिरमे,विकी उगले, शिवराज घुमरे, अनिकेत जाधव,संदीप बोराटे, विक्रांत अब्दुले,आदेश सरोदे चेतन फुंदे,संजय फुटाणे,प्रितम ढगे,निलेश निगुडे,विलास शिंदे,भाऊ कोळपकर,सौरभ शिंदे,ॠषी नागरगोजे,महेश जरक आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ल. ना. होशिंग विद्यालय येथे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे…
महालोकवाणी नगर प्रतिनिधी – विजय मते- नगरसेविका रुपालीताई वारे यांनी महासभेत उपस्थित केला होता प्रश्न. प्रभाग दोन मधील ओढे नाले साफ सफाई होणे बाबत आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडून पाहणीनगर – प्रभाग क्र.2 मधील पाईपलाईन रोडवरील वैष्णव कॉलनीमध्ये पावसाळ्यात पाण्याचे तळे साचते. जास्त पाऊस झाला तर कॉलनीतील घरात पाणी जाते. या भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने तसेच प्रभागातील ओढे नाले यांची साफ सफाई होणे बाबत नगरसेविका रुपालीताई वारे यांनी मनपाच्या सभेमध्ये, महासभेत हा प्रश्न वारंवार लावून धरला होता. या प्रश्नाची दखल मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी घेत शुक्रवारी दुपारी वैष्णव कॉलनी, भिटे मळा परिसराची पाहणी करुन वस्तूस्थिती लक्षात घेऊन परिस्थितचे…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवारजामखेड – मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग जामखेड शाखेतर्फे ग्रामीण विकास केंद्र संचलित अनाथ, निराधार व लोककलावंताच्या मुलांकरिता कार्यरत असणाऱ्या निवारा बालगृहाला एक महिन्याचा किराणा भेट देण्यात आला. सोबतच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अरुण आबा जाधव यांच्याशी मॅरेथॉन होल्डिंगचे केतन गर्जे यांनी संपर्क साधून संस्थेसाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी जाधव यांनी सध्या आम्हाला किराण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी गर्जे यांनी यांस सहमती देत आम्ही संस्थेला एक महिन्याचा किराणा देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज दिनांक 13 मे रोजी मॅरेथॉन डिजिटल होल्डींगच्या जामखेड येथील सहकाऱ्यांनी संस्थेस भेट देत एक महिन्याचा किराणा भेट दिला. समाजात…
पुणे जिल्ह्यातील( pune )मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांची काल दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेने फक्त तळेगावच नाही तर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त बंद पुकारला होता. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.👇 पुढे बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
कृषी मंत्र्यांनीही कौतुक केलेल्या शेतकरी हिताच्या कामात अडथळा का?; कर्जत जामखेड मतदारसंघात नेमकं काय चाललंय? सविस्तरबातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा